Join us  

बांगलादेश क्रिकेटपटूंनी मागे घेतला संप; भारत दौरा निर्धारीत कार्यक्रमानुसार होणार

वेतनवाढी व अन्य सुविधांच्या मागणीसाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी सुरु केलेला संप अखेर स्टार अष्टपैलू व वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसन याच्या नेतृत्त्वाखाली मागे घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 12:23 PM

Open in App

ढाका : वेतनवाढी व अन्य सुविधांच्या मागणीसाठी बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी सुरु केलेला संप अखेर स्टार अष्टपैलू व वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसन याच्या नेतृत्त्वाखाली मागे घेतला. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) मागण्या मान्य केल्यानंतर खेळाडूंनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून आता आगामी भारत दौºयावरील संकट टळले आहे.

बुधवारी सुमारे मध्यरात्रीपर्यंत झालेल्या बैठकीत खेळाडू आणि बोर्डातील संघर्ष संपुष्टात आला. खेळाडूंनी संप मागे घेतल्याने आता ३ नोव्हेंबरपासून सुरु होणारा बांगलादेशचा भारत दौरा निर्धारीत कार्यक्रमानुसार पार पडेल. या दौºयासाठी बांगलादेशचे खेळाडू शुक्रवारपासून संघाच्या सराव शिबिरामध्येही सहभागी होतील.

संप मागे घेतल्याविषयी शाकिब अल हसन याने सांगितले की, ‘बीसीबी प्रमुख नझमुल हसन यांच्या सांगण्यानुसार झालेली चर्चा फायदेशीर ठरली. त्यांनी आणि इतर निर्देशकांनी लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्याविषयी आम्हाला आश्वासन दिले आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आम्ही एनसीएलमध्ये खेळण्यास सुरुवात करु. शिवाय राष्ट्रीय सराव शिबिरामध्येही सहभागी होऊ.’  या बैठकीमध्ये शाकिबसह मुशफिकुर रहिम, महमुद्दुल्लाह  आणि तमिम इक्बाल यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंचीही उपस्थिती होती. 

बांगलादेशचा संघ जाहीरशकिब अल हसन ( कर्णधार), तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.

मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20,  दिल्ली7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर

14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशबांगलादेश