Join us  

साडी अन् हातात बॅट!; आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचं हटके Wedding PhotoShoot!

बांगलादेशकडून आतापर्यंत १६ वन डे आणइ ५४ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात तिनं अनुक्रे १६४ व ५२० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त नाबाद ७१ ही तिची सर्वोत्तम खेळी आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 21, 2020 4:16 PM

Open in App

बांगलादेशची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू संजीदा इस्लाम ( Sanjida Islam) हीनं नुकतंच लग्न केलं. २४ वर्षीय संजीदा ने रंगपूर येथील प्रथम श्रेणी क्रिकेटपटू मिम मोसद्दक याच्यासोबत विवाह केला. पण, तिच्या लग्नाची चर्चा एका वेगळ्याच कारणानं रंगली आहे. संजीदा आणि मिम यांनी १८ ऑक्टोबरला लग्न केल्याचे स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार कळते. संजीदा Pre Wedding PhotoShoot दरम्यान साडी नेसून क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करताना दिसली. 

१ एप्रिल १९९६मध्ये रंगपूर येथे जन्मलेल्या संजीदा ही तीन भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. शालेय स्तरापासून ती क्रिकेट खेळतेय.. २००९मध्ये ती महिला क्रिकेटर म्हणून बांगलादेश क्रीडा प्राधिकरणात सहभागी झाली. १६ व्या वर्षीय तिनं २०१२मध्ये ट्वेंटी-20 क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.  तिनं बांगलादेशकडून आतापर्यंत १६ वन डे आणइ ५४ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात तिनं अनुक्रे १६४ व ५२० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त नाबाद ७१ ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. 

टॅग्स :आयसीसीबांगलादेशमहिला टी-२० क्रिकेट