Bangladesh squad for ODIs: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशने उतरवला तगडा संघ; शाकिब अल हसनची झाली एन्ट्री

भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 07:42 PM2022-11-24T19:42:27+5:302022-11-24T19:43:19+5:30

whatsapp join usJoin us
  Bangladesh have announced their squad for the ODI series against India and Shakib Al Hasan has been included in the squad  | Bangladesh squad for ODIs: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशने उतरवला तगडा संघ; शाकिब अल हसनची झाली एन्ट्री

Bangladesh squad for ODIs: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी बांगलादेशने उतरवला तगडा संघ; शाकिब अल हसनची झाली एन्ट्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर झाला आहे. 4 डिसेंबरपासून वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. आगामी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी शाकिब अल हसनचे बांगलादेशच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. तो जुलै-ऑगस्टनंतर पहिल्यांदाच वनडे मालिका खेळत आहे. यासिर अलीला देखील संघात स्थान मिळाले आहे. तर झिम्बाब्वेमधील तिसऱ्या वनडे सामन्यात पदार्पण करणारा तेजस्वी इबाडोट हुसैन यालाही संधी मिळाली आहे.

खरं तर भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र आगामी बांगलादेश दौऱ्यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांचे पुनरागमन होणार आहे. 

बांगलादेशचा वनडे संघ - 
तमिम इक्बाल (कर्णधार), लिटन दास, अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला. 

बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल. 

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ 
 रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक 

  • 1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल
  • 4 डिसेंबर - पहिला वनडे सामना, ढाका
  • 7 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, ढाका
  • 10 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, ढाका
  • 14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
  • 22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
  • 27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title:   Bangladesh have announced their squad for the ODI series against India and Shakib Al Hasan has been included in the squad 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.