ढाका : बांगलादेश क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीस संघ मंगळवारी जाहीर केला आहे. त्यांनी या संघात अबू जायेद या युवा गोलंदाजाला स्थान दिले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जायेदने आपल्या स्वींग गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने अद्याप एकही वन डे सामना खेळलेला नाही. 2018च्या आशिया चषक स्पर्धेला मुकलेला मोसाडेक होसैनने बांगलादेश संघात पुनरागमन केले आहे.
बांगलादेश संघाचे निवड समिती प्रमुख नाझमुल हसन पापोन यांनी हा संघ जाहीर केला. तरीही बांगलादेश संघावर अद्यापही दुखापतग्रस्त खेळाडूंचे ग्रहण आहे. महमदुल्लाहला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली होती, तर मुस्ताफिजूर रहमान यालाही ढाका प्रीमिअर लीगमधून माघार घ्यावी लागली होती. रुबेल हुसेन हाही दुखापतग्रस्त आहे. मुश्फीकर रहीम आणि तमित इक्बाल हेही पूर्णपणे तंदुरूस्त नाही. शकिब अल हसनही त्याच परिस्थितीतून जात आहे.
बांगलादेश : मश्रफे मोर्ताझा ( कर्णधार), शकिब अल हसन ( उपकर्णधार), तमीत इक्बाल, महमदुल्लाह, मुश्फीकर रहीम, सौम्या सरकार, लिटन दास, सब्बीर रहमान, मेहिदी हसन, मोहम्मद मिथून, रुबेल होसैन, मुस्ताफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मोसाडेक होसैन, अबु जायेद.