Join us  

Women’s Asia Cup 2022: महिला आशिया चषकाची झाली घोषणा! भारतीय महिला सातव्यांदा जिंकणार किताब?

महिला आशिया चषक २०२२ ची घोषणा झाली असून बांगलादेशच्या धरतीवर यंदाची स्पर्धा पार पडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 5:37 PM

Open in App

नवी दिल्ली : महिला आशिया चषक २०२२ ची (Women's Asia Cup 2022) घोषणा झाली असून बांगलादेशच्या (Bangladesh Women Cricket team) धरतीवर यंदाची स्पर्धा पार पडणार आहे. १ ते १६ ऑक्टोंबरदरम्यान या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगेल. बांगलादेशच्या यजमानपदात सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket stadium) ही स्पर्धा आयोजित केली जाईल. एकूण ७ संघामध्ये किताबासाठी लढत होणार आहे. दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC)  अद्याप स्पर्धेच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु बांगलादेश क्रिकेट बोर्ड महिला समितीचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नादेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

७ संघांमध्ये रंगणार 'सामना' ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात यूएईमध्ये महिला टी-२० विश्वचषक पात्रता फेरीनंतर ही स्पर्धा होणार आहे. आयसीसीने मागील आठवड्यात आपला फ्युचर टूर प्रोग्राम जाहीर केला, ज्यामध्ये ऑक्टोबरमधील २ आठवडे महिला आशिया चषकाला देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, यूएई आणि यजमान बांगलादेश हे सात सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ २७ किंवा २८ सप्टेंबरपर्यंत बांगलादेशला पोहोचतील.

चौधरी यांनी सांगितले, "बोर्डासाठी विमानतळ आणि हॉटेल जवळ असल्याचा विचार करता सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच इथे सात संघाच्या राहण्याची व्यवस्था देखील करता येईल. महिला आशिया चषकाचे सामने सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या ग्राउंड १ मध्ये खेळवले जातील तर ग्राउंड २ मध्ये संघांना सराव करता येईल." लक्षणीय बाब म्हणजे ऑक्टोबर २०१८ पासून पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद बांगलादेश सांभाळणार आहे.

भारतीय महिला सातव्यांदा जिंकणार किताब? २०१२ पासून महिला आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. शेवटच्या वेळी हे २०१८ मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, जिथे बांगलादेशने सहा वेळच्या चॅम्पियन भारताचा शेवटच्या चेंडूवर पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले होते. 

 

टॅग्स :एशिया कपमहिला टी-२० क्रिकेटभारतीय महिला क्रिकेट संघभारतबांगलादेशपाकिस्तान
Open in App