भारताच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकू शकतात बांगलादेशचे खेळाडू; क्रिकेट अध्यक्षांनाच भिती

बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नाजमुल हसन यांनीच ही भिती वर्तवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 07:36 PM2019-10-28T19:36:52+5:302019-10-28T19:40:35+5:30

whatsapp join usJoin us
Bangladesh players can boycott India tour; President of Bangladesh Cricket Board | भारताच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकू शकतात बांगलादेशचे खेळाडू; क्रिकेट अध्यक्षांनाच भिती

भारताच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकू शकतात बांगलादेशचे खेळाडू; क्रिकेट अध्यक्षांनाच भिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताच्या दौऱ्यापूर्वी बांगलादेशच्या संघामध्ये वादळ आले आहे.सुरुवातीला बांगलादेशच्या संपूर्ण संघाने बंड पुकारले होते आणि पगारवाढीसाठी त्यांनी भारताच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू शकिब अल हसनला बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने नोटीस पाठवली आहे. आता तर भारताच्या दौऱ्यावर बांगलादेशचा संघ बहिष्कार टाकू शकतो, असे वृत्त आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नाजमुल हसन यांनीच ही भिती वर्तवली आहे.

हसन म्हणाले की, " तमीम इक्बालने काही दिवसांपूर्वीत भारताच्या दौऱ्यातून माघार घेतली आहे. आज मी शकिब अल हसनला भेटलो. आता शकिबने पण दौऱ्यातून माघार घेतली तर मी आता कुठे कर्णधार शोधत बसायचे. माझ्यामते बांगलादेशचे खेळाडू भारताच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. ऐनवेळी जर खेळाडूंनी जर माघार घेतली तर हा दौरा कसा होईल."

भारताच्या दौऱ्यापूर्वीच बांगलादेशच्या शकिब अल हसनला पाठवली नोटीस
मुंबई : बांगलादेशचा भारत दौरा हा सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुरुवातीला बांगलादेशच्या संपूर्ण संघाने बंड पुकारले होते आणि पगारवाढीसाठी त्यांनी भारताच्या दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता तर बांगलादेशचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू शकिब अल हसनला बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता तो भारताच्या दौऱ्यावर जाणार की नाही, याबाबत संदिग्धती निर्माण झाली आहे.

शकिबने बांगलादेशमधील प्रमुख टेलीकॉम कंपनी ‘ग्रामीणफोन’बरोबर एक करार केला आहे. शकिबला या कंपनीने आपला ब्रँड अॅम्बेसिडर बनवला आहे. पण बांगलादेशच्या संघाची प्रायोजक ‘रोबी’ ही कंपनीदेखील टेलीकॉम क्षेत्रात आहे आणि ती कंपनी ‘ग्रामीणफोन’ या कंपनीची प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी शकिबविरुद्ध कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शकिबला आता क्रिकेट मंडळाकडून एक नोटीस पाठवली जाईल आणि त्याला पहिल्या सामन्यापूर्वी या नोटीशीला उत्तर द्यावे लागेल. जर शकिबने उत्तर दिले नाही तर त्याला खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे.

Web Title: Bangladesh players can boycott India tour; President of Bangladesh Cricket Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.