मुंबई : सुरक्षेच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण आता बांगलादेशनेपाकिस्तानमध्ये कसोटी सामने खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी श्रीलंकेचा संघ पाकिस्तानमध्ये गेला होता. दोन्ही संघांमध्ये मालिकाही खेळवण्यात आला. आता बांगलादेशचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण कसोटी सामन्यांसाठी जास्त दिवस लागतात. त्यामुळे पाकिस्तानमध्ये जास्त दिवस राहण्याची आमची इच्छा नाही, असे बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने कळवले आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी डेली स्टार या वृत्तपत्रामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, " पाकिस्तानमध्ये जास्त काळ राहण्याची आम्हाला भिती वाटते. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. पाकिस्तानमध्ये आम्ही ट्वेन्टी-२० सामने खेळू शकतो. पण कसोटी सामने नाही. त्यांना जर आमच्याबरोबर कसोटी सामने खेळवायचे असतील तर ते त्रयस्थ ठिकाणी खेळवायला हवेत."
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. पण तणावाचे वातावरण असतानाही पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) सुरक्षा व्यवस्थेबाबत एक खोचक वक्तव्य केले होते. या वक्तव्याला भारताने आज चोख उत्तर दिले आहे.
पाकिस्तान संघानं घरच्या मैदानावर दहा वर्षांनी झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांनी वर्चस्व गाजवला. पाकिस्ताननं दुसरा सामना 263 धावांनी जिंकला. या विजयासह पाकिस्ताननं दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली. या मालिकेनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी एक धक्कादायक विधान केलं. पाकिस्तान हा भारतापेक्षा सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला होता.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष माहिम वर्मा यांनी पीसीबीच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. वर्मा म्हणाले की, " पीसीबीने पहिल्यांदा स्वत:कडे पाहायला हवे आणि आपल्या देशातील सुरक्षतेबाबत विचार करायला हवा. आम्ही देशातील सुरक्षा सांभाळण्यासाठी सक्षम आहोत. सुरक्षेच्या कारणास्तव तुमच्या देशात यापूर्वी सामने का होत नव्हते, याचा विचार तुम्ही करायला हवा."
Web Title: Bangladesh refuses to play Test matches in Pakistan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.