Join us  

टीम इंडियासाठी एक सोपा पेपर; इथं पाहा कसा असेल बांगलादेशचा भारत दौरा?

एक नजर टाकुयात भारत आणि बांगलादेश या दोन संघातील द्विपक्षीय कसोटी मालिकेचा कार्यक्रम आणि पाहुण्या संघाला असलेल्या कडव्या आव्हनासंदर्भातील गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 11:54 AM

Open in App

बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानला त्यांच्या घरात शह देत कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. त्यांनी फक्त मालिका जिंकली नाही, तर पाकिस्तानी क्रिकेट संघाला त्यांनी क्लीन स्वीप दिली. पाकिस्तान विरुद्ध त्यांनी मिळवलेला हा पहिला वहिला कसोटी मालिका विजय आहे.

पाहुण्या संघासमोर टीम इंडियाच्या रुपात अवघड पेपर

बांगलादेशचा संघ एखाद्या सामन्यात मोठा उलटफेर करण्यात माहिर आहे. अनेकदा त्यांनी ही गोष्ट करून दाखवलीये. पण पाकिस्तान संघाविरुद्धच्या विजयानंतर त्यांच्यासमोर खरं चॅलेंज असणार आहे. कारण ते आता भारतीय संघाविरुद्ध भारतीय मैदानात कसोटीसाठी सज्ज असतील. याच महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्याआधी एक नजर टाकुयात भारत आणि बांगलादेश या दोन संघातील द्विपक्षीय कसोटी मालिकेचा कार्यक्रम आणि पाहुण्या संघाला कोणते असेल आव्हान 

बांगलादेशसमोर फिरकीचं कडवे आव्हान

पाकिस्तान नंतर आता बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. १८ सप्टेंबरला चेन्नईच्या मैदानातून या द्विपक्षीय मालिकेला सुरुवात होईल. चेपॉक स्टेडियमवर फिरकीचा बोलबाला पाहायला मिळतो. त्यामुळे या सामन्यासाठी भारताच्या फिरकीचं कडवं आव्हान बांगलादेश समोर असेल.

कुठे पाहू शकता सामना?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरला कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. बांगलादेशचा संघ कसोची जेतेपदाची फायनल खेळण्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे भारतीय संघ आपले अव्वलसथान आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल. भारत आणि बांगलादेश भारत यांच्यातील मालिकेचे  लाइव्ह प्रक्षेपण स्टार जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स १८ नेटवर्क चॅनेलवर पाहाता येईल. 

कसा आहे दोन्ही संघातील कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड? 

भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत. यातील ११ सामन्यात टीम इंडिया अजिंक्य राहिली आहे. पहिल्या पराभवाच्या प्रतिक्षेत असलेल्या बांगलादेशनं भारताविरुद्ध दोन कसोटी सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवलं होते. ही त्यांची भारताविरुद्धची सर्वोच्च कामगिरी आहे. 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारतीय क्रिकेट संघबांगलादेशबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ