बांगलादेशचा अफगाणिस्तानवर तीन धावांनी थरारक विजय

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत बांगलादेशनमे अफगाणिस्तानवर अवघ्या तीन धावांनी मात केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 02:48 AM2018-09-24T02:48:13+5:302018-09-24T02:48:40+5:30

whatsapp join usJoin us
Bangladesh thrash Afghanistan by three runs | बांगलादेशचा अफगाणिस्तानवर तीन धावांनी थरारक विजय

बांगलादेशचा अफगाणिस्तानवर तीन धावांनी थरारक विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अबुधाबी  - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत बांगलादेशनमे अफगाणिस्तानवर अवघ्या तीन धावांनी मात केली.  मोहम्मद शहझाद आणि हशमतुल्ला शाहिदी यांची अर्धशतके, तसेच असगर अफगाण आणि मोहम्मद नबी यांच्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. मात्र शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरत असताना मुस्तफिझुर रहमानने टिच्चून मारा करत बांगलादेशला थरारक विजय मिळवून दिला. 

तत्पूर्वी महमदुल्लाह (७४)आणि इमरुल कायेस (नाबाद ७२) यांनी सहाव्या गड्यासाठी केलेल्या १२८ धावांच्या भागीदारीच्या बळावर बांगलादेशने आशिया चषकाच्या सुपर फोर लढतीत रविवारी सुरुवातीच्या धक्क्यातून सावरून अफगाणिस्तानविरुद्ध ७ बाद २४९ अशी आव्हानात्मक मजल गाठली.
अर्धा संघ ८७ धावांत परतल्यानंतर महमदुल्लाह-कायेस यांनी पडझड थांबवून धावसंख्येला आकार दिला. या दोघांशिवाय सलामीचा लिटन दास याने ४१ आणि मुशफिकर रहीमने ३३ धावांचे योगदान दिले.आफताब आलम (५४ धावांत तीन बळी) आणि मुजीब रहमान (३५ धावांत एक) यांनी सलामी जोडीला ताबडतोब बाद करीत बांगलादेशचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरविला. लिटन-मुशफिकरने तिसऱ्या गड्यासाठी ६३ धावा केल्या. पण या दोघांसह शाकिब अल हसन हा बाद होताच बांगलादेश पुन्हा बॅकफूटवर आला.महमदुल्लाह-कायेस यांनी सुरुवातीला सावध खेळून कमकुवत चेंडूवर फटकेबाजी करीत डाव सावरला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Bangladesh thrash Afghanistan by three runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.