Bangladesh vs West Indies: वेस्ट इंडिजची थरारक सामन्यात बांगलादेशवर मात

शिमरॉन हेटमेयरच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुस-या वन डेत बांगलादेशला तीन धावांनी नमवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 01:18 PM2018-07-26T13:18:23+5:302018-07-26T13:19:42+5:30

whatsapp join usJoin us
Bangladesh vs West Indies: west indies beat Bangladesh in a thrilling match | Bangladesh vs West Indies: वेस्ट इंडिजची थरारक सामन्यात बांगलादेशवर मात

Bangladesh vs West Indies: वेस्ट इंडिजची थरारक सामन्यात बांगलादेशवर मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

प्रोव्हीडन्स - शिमरॉन हेटमेयरच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुस-या वन डेत बांगलादेशला तीन धावांनी नमवले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत विजय मिळवून वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे. 



अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी आठ धावांची आवश्यकता होती, परंतु जेसन होल्डरने चारच धावा देताना विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजच्या 271 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 6 बाद 268 धावा करता आल्या.  हेटमेयरने 93 चेंडूंत 7 षटकार आणि 3 चौकार लगावत  125 धावा कुटल्या. त्याला रोव्हमन पॉवेलने 44 धावा करून चांगली साथ दिली.
बांगलादेशकडून तमीम इक्बाल (54), शकिब अल हसन ( 56), मुश्ताफिकुर रेहमान ( 68) आणि महमदुल्लाह (39) यांनी उपयुक्त खेळ केला. मात्र, त्यांना विजयाने हुलकावणी दिली. 


 

Web Title: Bangladesh vs West Indies: west indies beat Bangladesh in a thrilling match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.