Join us  

Bangladesh vs West Indies: वेस्ट इंडिजची थरारक सामन्यात बांगलादेशवर मात

शिमरॉन हेटमेयरच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुस-या वन डेत बांगलादेशला तीन धावांनी नमवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 1:18 PM

Open in App

प्रोव्हीडन्स - शिमरॉन हेटमेयरच्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुस-या वन डेत बांगलादेशला तीन धावांनी नमवले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत विजय मिळवून वेस्ट इंडिजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे. अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी आठ धावांची आवश्यकता होती, परंतु जेसन होल्डरने चारच धावा देताना विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजच्या 271 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला 6 बाद 268 धावा करता आल्या.  हेटमेयरने 93 चेंडूंत 7 षटकार आणि 3 चौकार लगावत  125 धावा कुटल्या. त्याला रोव्हमन पॉवेलने 44 धावा करून चांगली साथ दिली.बांगलादेशकडून तमीम इक्बाल (54), शकिब अल हसन ( 56), मुश्ताफिकुर रेहमान ( 68) आणि महमदुल्लाह (39) यांनी उपयुक्त खेळ केला. मात्र, त्यांना विजयाने हुलकावणी दिली.  

टॅग्स :वेस्ट इंडिजबांगलादेशक्रिकेटक्रीडा