क्रिकेट विश्वचषक २०२३चा तिसरा कसोटी सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही स्पर्धांमध्ये बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामन्यातील खुन्नस क्रिकेटविश्वाने अनुभवली आहे. त्यामुळे एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत शनिवारी होणाऱ्या सामन्याद्वारे पुन्हा एकदा क्रिकेटविश्व हाच रोमांच अनुभवेल. त्याचवेळी, बांगलादेशला अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज राहावे लागेल.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बांगलादेश संघ झुंजार आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच कर्णधार शाकिब अल हसन आणि तमिम इक्बाल या दोन अनुभवी आणि प्रमुख खेळाडूंमधील मतभेद सर्वांसमोर आल्याने बांगलादेश संघात सध्या गंभीर वातावरण आहे. विश्वचषक संघात स्थान न मिळाल्यानंतर इक्बाल आणि शाकिब यांच्यातील वाद सर्वांसमोर आला होता. तमिमला संघात स्थान देण्यामागचे कारण देताना बांगलादेशच्या निवडकर्त्यांनी त्याला पाठदुखी असल्याचे सांगितले होते, तर एका मुलाखतीत शाकिबने तमिमने तिसऱ्या स्थानी फलंदाजीस नकार दिल्याचे म्हटले होते. शाकिबने त्याला बालिश खेळाडूही संबोधले होते, तसेच तो संघासाठी खेळण्याच्या पात्रतेचा नसल्याचेही म्हटले होते.
अफगाणिस्तानचे प्लेइंग इलेव्हन: रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम जद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद ह्रदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.