मुंबई : नवी दिल्लीमध्ये वायू प्रदूषणामुळे वाईट परिस्थिती आहे. भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना नवी दिल्ली येथेच 3 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबाबत बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी एक मोठे विधान केले आहे.
पर्यावरण तज्ज्ञांनी मंगळवारी दिल्लीमध्ये सामना खेळवला जाऊ नये, असे पत्र बीसीसीआयला पाठवले होते. त्यामुळे या सामन्याबाबत संदिग्धता होती. पण आता तर दिल्लीच्या वातावरणाबाबत एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा सामना आता संकटात सापडला असल्याचे म्हटले जात होते.
दिल्लीमध्ये कोणताही सामना खेळू नका, असे खळबळजनक वक्तव्य दिल्लीच्याच एका माजी क्रिकेटपटूने केले आहे. त्यामुळे खरंच दिल्लीमध्ये आता सामना खेळवायचा की नाही, याचा विचार बीसीसीआयला पुन्हा एकदा करावा लागणार आहे.
बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो याबद्दल म्हणाले की, " नवी दिल्लीतील वातावरण हे सामन्यासाठी आदर्शवत असे नाही. बांगलादेशमध्येही प्रदूषणाची समस्या आहे. त्यामुळे या वातावरणात कोणीही मरणार नाही. आमचे लक्ष्या हे सामन्यातील कामगिरीवर असेल. त्यामुळे प्रदूषणाबाबत आम्ही अजूनही विचार केलेला नाही."
भारतामध्ये बांगलादेशच्या संघाला करावा लागतोय मास्क लाऊन सराव, बीसीसीआयवर नामुष्कीची वेळमुंबई : दिल्ली येथे भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी बऱ्याच जणांनी केली होती. पण बीसीसीआयने ते मान्य केले नाही. सध्या बांगलादेशचा संघ दिल्लीमध्ये दाखल झाला आहे. पण प्रदूषणामुळे त्यांच्यावर मास्क लावून सराव करण्याची वेळ आली आहे. ही बीसीसीआयची नामुष्की असल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की, " जोपर्यंत दिल्लीमधील प्रदूषणाचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत कोणत्याही सामन्याचे आयोजन येथे करू नये. कोणतीही स्पर्धा किंवा सामना दिल्लीच्या जनतेपेक्षा मोठा नाही. प्रदूषणामुळे दिल्लीची जनता हैराण आहे. पहिल्यांदा प्रदूषण कमी करा आणि त्यानंतर सामने खेळवा, अशी माझी भूमिका आहे."