नवी दिल्ली: आगामी टी-२० बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या महिला संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी पहिल्यांदाच फिरकीपटू आशा शोभना आणि फलंदाज साजना सजीवन यांची भारतीय संघात निवड झाली आहे. २८ एप्रिलपासून या मालिकेला सुरुवात होईल. लेग स्पिनर शोभनाने यंदाच्या डब्ल्यूपीएलमध्ये शानदार कामगिरी करताना बंगळुरूच्या जेतेपदामध्ये मोलाची भूमिका निभावली.
तिने १० सामन्यांतून १२ बळी घेतले होते. दुसरीकडे, सजीवनने मुंबईकडून छाप पाडताना उपांत्य सामन्यात ७४ धावांची शानदार खेळी केली होती. संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे कायम सोपविण्यात आले आहे. यंदाच्या वर्षाअखेरीस टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार असल्याने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मालिकेतील सर्व सामने सिलहट येथे खेळविण्यात येतील. मालिकेतील सामने २८ एप्रिल, ३० एप्रिल २ मे, ६ मे आणि ९ मे रोजी खेळविण्यात येतील.
भारतीय महिला संघ :हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, डी. हेमलता, साजना सजीवन, रिचा घोष, यास्तिका भाटिया, राधा यादव, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, अमनजोत कौर, श्रेयांका पाटील, साइका इशाक, आशा शोभना, रेणुका सिंग आणि तितास साधू,
IND vs BAN ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक
- २८ एप्रिल - पहिला सामना - सिल्हेट
- ३० एप्रिल - दुसरा सामना - सिल्हेट
- २ मे - तिसरा सामना - सिल्हेट
- ६ मे - चौथा सामना - सिल्हेट
- ९ मे - पाचवा सामना - सिल्हेट