INDW vs BANW T20 Series: भारताचा महिला क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. २८ एप्रिल ते ९ मे या कालावधीत ही मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ २३ एप्रिलला बांगलादेशात पोहोचेल आणि १० मेला भारताकडे रवाना होईल. सर्व सामने सिल्हेट येथे खेळवले जाणार आहेत.
दरम्यान, मागील वर्षी भारतीय संघ जेव्हा बांगलादेशात गेला होता तेव्हा ती मालिका नाना कारणांनी चर्चेत राहिली होती. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला वादग्रस्त निर्णयावर बाद दिल्याने नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. आपल्या तापट स्वभावामुळे नेहमी हरमन चर्चेत असते. हरमनप्रीत कौर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. या आधी देखील हरमन वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मागील वर्षी बांगलादेश आणि भारत यांच्यातील अखेरच्या वन डे सामन्यात काही नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. ढाका येथे झालेल्या निर्णायक वन डे सामन्यात हरमनने अम्पायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते. याशिवाय सामन्यानंतर बोलताना तिने काही गंभीर आरोप केले होते.
२८ एप्रिलपासून थरार
दरम्यान, भारतीय कर्णधार हरमनप्रीतला लेव्हल २ च्या गुन्ह्यासाठी हरमनला तिच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला होता. तसेच तिच्यावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. तिला अम्पायरने बाद देताच हरमनने संताप व्यक्त करत स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली. मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. त्यामुळे आगामी मालिका हरमनप्रीतसह भारतीय संघासाठी खूप खास असणार आहे.
IND vs BAN ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक
- २८ एप्रिल - पहिला सामना - सिल्हेट
- ३० एप्रिल - दुसरा सामना - सिल्हेट
- २ मे - तिसरा सामना - सिल्हेट
- ६ मे - चौथा सामना - सिल्हेट
- ९ मे - पाचवा सामना - सिल्हेट
Web Title: BANW vs INDW Indian women's cricket team to tour Bangladesh for five-match T20 series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.