Join us  

शेतकऱ्याचा मुलगा, झहीरसारखी गोलंदाजी, केली जोरदार सुरुवात, पण अचानक क्रिकेटमधून झाला गायब 

barinder sran: या खेळाडूचं नाव आहे बरिंदर सरन. त्याने २०१६ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. लहानपणी त्याने बॉक्सर बनायचं स्वप्न पाहिलं होतं. भिवानीमधील बॉक्सिंग केंद्रात प्रशिक्षणही घेतलं. मात्र नंतर त्याची पावलं क्रिकेटच्या मैदानात वळली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 6:13 PM

Open in App

क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न हे भारतीय संघातून खेळण्याचं असतं. मात्र अगदी मोजक्याच क्रिकेटपटूंचं हे स्वप्न पूर्ण होतं. काही जणांना संधी मिळते, पण त्यांची कारकीर्द अल्पजीवी ठरते. अशाच एका क्रिकेटपटूनं साडे सहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याची कारकीर्द जवळपास वर्षभरातच संपुष्टात आली. त्यानंतर त्याला भारतीय संघामध्ये पुन्हा संधी मिळाली नाही.

या खेळाडूचं नाव आहे बरिंदर सरन. त्याने २०१६ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. लहानपणी त्याने बॉक्सर बनायचं स्वप्न पाहिलं होतं. भिवानीमधील बॉक्सिंग केंद्रात प्रशिक्षणही घेतलं. मात्र नंतर त्याची पावलं क्रिकेटच्या मैदानात वळली. आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब या संघाची जाहिरात पाहून त्याने ट्रायलमध्ये भाग घेतला. पहिल्या प्रयत्नात त्याला संधी मिळाली नाही. मात्र पंजाच्या ३५ ते ४० अनकॅप्ड खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाला. त्याने चंडीगडमधील अकादमीत प्रशिक्षण घेतले. अखेर २०१५ च्या लिलावामध्ये बरिंदर सरनला राजस्थान रॉयल्सने खरेदी केले.

त्यानंतर शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या बरिंदर सरनने भारतीय संघातही स्थान मिळवले. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ६ वनडे आणि २ टी-२० सामने खेळले होते. बरिंदर सरनने या ६ वनडेत ७ आणि २ टी-२० मध्ये ६ विकेट्स मिळवल्या होत्या. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील १८ सामन्यांमध्ये त्याने ४७ आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये एकूण ४५ विकेट्स मिळवल्या होत्या. बरिंदर सरनने त्याचा शेवटचा क्रिकेट सामना फेब्रुवारी २०२१ मध्ये खेळला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानात दिसलेला नाही.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२२
Open in App