Join us  

बडोदा महिला क्रिकेट संघाच्या बसचा विशाखापट्टणममध्ये अपघात, ४ खेळाडू आणि कोच जखमी!

बडोदाच्या महिला क्रिकेट संघाच्या बसला शुक्रवारी अपघात झाला. आंध प्रदेशमध्ये टुर्नामेंटसाठी जात असताना बडोदाच्या संघाच्या बसला विशाखापट्टणममध्ये हा अपघात घडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 9:07 PM

Open in App

विशाखापट्टणम-

बडोदाच्या महिला क्रिकेट संघाच्या बसला शुक्रवारी अपघात झाला. आंध प्रदेशमध्ये टुर्नामेंटसाठी जात असताना बडोदाच्या संघाच्या बसला विशाखापट्टणममध्ये हा अपघात घडला. यात संघाची बसची एका ट्रकशी धडक झाली. अपघातात ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत संघाचे प्रशिक्षक आणि काही खेळाडू जखमी झाले आहेत. सुदैवानं कोणत्याही व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली नाही.  

एएनआयने वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणमच्या ज्ञानपुरममध्ये बडोदा महिला क्रिकेट संघाची बस एका ट्रकला धडकली. या अपघातात बडोदा संघाचे चार खेळाडू आणि प्रशिक्षक जखमी झाल्याचे विशाखापट्टणम पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे. या सर्वांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

खेळाडूंना उपचारानंतर डिस्चार्जमिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमध्ये महिला सीनियर टी-20 चॅम्पियनशिप खेळून संघ आपल्या मूळ गावी वडोदरा येथे परतत होत्या. कोणत्याही खेळाडूची आणि प्रशिक्षकाची दुखापत फारशी गंभीर नव्हती ही दिलासादायक बाब होती. या सर्वांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जखमी खेळाडू आणि संघासह प्रशिक्षक वडोदरा येथे परतले आहेत.

बडोद्याची चमकदार कामगिरीसंघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर बडोदाचा संघ आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथे झालेल्या स्पर्धेत खेळत होता. यादरम्यान, बडोद्याने १४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान ४ टी-२० सामने खेळले, ज्यात सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले आणि ३ सामने जिंकले. मुंबईविरुद्ध बडोद्याचा एकमेव पराभव झाला. संघाने २० ऑक्टोबर रोजी सौराष्ट्रचा ७ गडी राखून पराभव केला, ज्यामध्ये संघाची कर्णधार यास्तिका भाटियाने महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाच्या या युवा फलंदाजाने नाबाद ६४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटअपघात
Open in App