कोलंबो - श्रीलंकेच्या एका युवा फलंदाजाने एका ओव्हरमध्ये सात षटकार ठोकत याआधीचे सर्व रेकॉर्ड्स उद्ध्वस्त केले आहेत. गेल्याच आठवड्यात 9 डिसेंबरला झालेल्या होम टुर्नामेंट अंडर 15 मुरली गुडनेस कपच्या अंतिम सामन्यात नविंदु पहसाला या खेळाडूने हा रेकॉर्ड केला आहे. यावेळी श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन मैदानातच उपस्थित होता. त्याने या युवा फलंदाजाचं तोंडभरुन कौतुक केलं.
नविंदु पहसाला एफओजी अकॅडमीचा खेळाडू आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. आपल्या या खेळीचा नमुनाच त्याने टुर्नामेंटरदरम्यान दाखवून दिला. हिक्काडूवा श्री सुमंगाला एमसीसी लॉर्ड्स हा सामना खेळवण्यात आला होता.
पहसारा धर्मपाल कोट्टावाविरोधात फलंदाजी करताना नविंदु पहसाला तिस-या क्रमांकावर आला होता. यावेळी त्याने ताबडतोब फलंदाजी करत फक्त 89 चेंडूत 109 धावा केल्या. विशेष म्हणजे त्याने एका ओव्हरमध्ये सात षटकार ठोकण्याचा अनोखा विक्रमही केला. गोलंदाजाने एक नो बॉल टाकल्याने नविंदु पहसालाला हा अनोखा विक्रम करण्याची संधी मिळाली. यावेळी मैदानात उपस्थित मुथय्या मुरलीधरनने आपण नविंदु पहसालाची फलंदाजी पाहून अत्यंत आनंदी झाल्याचं सांगितलं. मुरलीधरनने फक्त स्तुती केली नाही, तर नविंदु पहसालाच्या भविष्यासाठी प्रार्थनाही केली.
Web Title: 'The batsman broke all the records, hits seven sixes in one over
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.