IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!

दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंग कोचला चक्क आपल्या संघाकडून फिल्डिंगसाठी मैदानात उतरावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 10:08 AM2024-10-08T10:08:32+5:302024-10-08T10:09:38+5:30

whatsapp join usJoin us
batting coach jp duminy fields as a substitute for south africa in odi match against ireland Know About Rule | IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!

IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात आयर्लंडनं आणखी एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. दुसऱ्यांदा त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करून दाखवले. अबु धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात आयर्लंडच्या संघाने ६९ धावांनी विजय नोंदवला. 

चक्क बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अखेरच्या वनडे सामन्यात एक वेगळाच नजारा पाहायला मिळाला. 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटातील "अरे हाय हाय ये मज़बूरी ये मौसम और ये दूरी" हे गाणं गाण्याची वेळ दक्षिण आफ्रिकेच्या संघावर आली.  कारण या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंग कोचला चक्क आपल्या संघाकडून फिल्डिंगसाठी मैदानात उतरावे लागले. आंतरराष्ट्रीय सामन्यात कोचिंग स्टाफमधील सदस्य फिल्डिंगला मैदानात उतरण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ही वेळ येण्यामागचं कारण काय? हा प्रकार नियमांचे उल्लंघन करणारा होता का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. 

काय सांगतो नियम?

आयर्लंडच्या डावातील अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजी प्रशिक्षक जेपी ड्युमिनी हा फ्लिडिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. सपोर्ट स्टाफमधील गडी फिल्डिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहणे थोड आश्चर्यकारक आहे. पण यात नियमाचं कोणतंही उल्लंघन झालेले नाही. आयसीसीच्या नियमानुसार, अतिरिक्त फिल्डरची कमी असल्यास कोचिंग स्टाफमधील सदस्य फिल्डिंग करू शकतो. याच नियमाच्या आधारे जेपी ड्युमिनी फिल्डिंगसाठी आला होता. 

दक्षिण आफ्रिकेच्या संघावर का आली अशी वेळ?

आयर्लंड विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात फक्त १३ खेळाडू होते. काही खेळाडूंना दुखापतीमुळे तर काही खेळाडूंना टी२० लीग मॅचेससाठी रिलीज करण्यात आले होते. अबु धाबीच्या मैदानातील अधिक उष्ण वातावरणामुळे थकवा जाणवत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील खेळाडू ठराविक अंतराने ब्रेक घेताना दिसले. अखेरच्या षटकात ३ खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतले. परिणामी ११ व्या खेळाडूच्या रुपात 

 

Web Title: batting coach jp duminy fields as a substitute for south africa in odi match against ireland Know About Rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.