नागपूर - श्रीलंकेविरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर आज नागपुरात दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आपलं विजयी खातं उघडण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ इच्छुक आहे. दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकत विजयी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरले आहेत. दोन्ही संघात कोलकातामध्ये झालेला पहिला सामना अनिर्णित राहिला होता. भारत विजयाच्या अत्यंत जवळ पोहोचला होता, मात्र कमी प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आणि विजय भारताच्या हातातून निसटला.
श्रीलंकेने आपल्या संघात कोणतेही बदल केलेले नाहीत. दरम्यान भारताकडून आपल्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. शिखर धवनने वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेतल्यामुळे मुरली विजयला संधी मिळाली असून भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत ईशांत शर्माने पुनरागमन केलं आहे. ईशांत सध्याच्या संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असून, तो ७७ कसोटी सामने खेळला आहे. मोहम्मद शामी जखमी झाला असून त्याच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली आहे.
होय ही दक्षिण अफ्रिका दौ-याची तयारीचएकापाठोपाठ एक मालिका जिंकल्या म्हणजे कर्णधारासह खेळाडूंमध्येही नवा आत्मविश्वास संचारतो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही त्याला अपवाद नाही. शुक्रवारपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणा-या दुस-या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना कोहलीच्या देहबोलीवरून ते स्पष्ट दिसत होते. दक्षिण आफ्रिका दौ-याच्या तयारीसाठी फार वेळ मिळणार नसल्यामुळे, संघ व्यवस्थापनाकडे श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेसाठी हिरवळ असलेल्या व उसळी घेणा-या खेळपट्ट्या तयार करण्याची विनंती केली, अशी स्पष्ट कबुली विराटने आज दिली.
जामठा स्टेडियम भारतासाठी ‘लकी’श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणारा दुसरा कसोटी सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातील ५० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. जामठा स्टेडियममध्ये यजमान संघ सहावा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने ३ विजय (एक अनिर्णीत व एक पराभव) मिळवताना या मैदानावर वर्चस्व गाजवले आहे.