नागपूर - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने दणक्यात सुरुवात केली. मात्र सलामीवीर आरोन फिंचची (32) विकेट काढत भारताने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंच बाद झाल्यावर स्टिव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर माघारी परतल्याने आता हँड्सकॉम्बही 13 धावा काढून तंबूत परतला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड 42 धावा काढून तंबूत परतला आहे. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. मार्कस स्टोइनिसनंतर मॅथ्यू वेड बाद झाला आहे.
भारतीय संघात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. उमेश यादव, मोहम्मद शमी आणि युझवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली आहे.चौथ्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला व्हाइटवॉश देण्याची संधी गमावलेला भारतीय संघ, रविवारी नागपूरमध्ये विजयाच्या निर्धारानेच उतरेल. फलंदाजीत मोक्याच्या वेळी झालेल्या चुकांचा फटका भारतीयांना तिस-या सामन्यात बसला. दुसरीकडे, चौथा सामना जिंकून चांगली लय मिळविलेला आॅसी संघ अखेरचा सामना जिंकून, एकदिवसीय मालिकेची विजयी सांगता करण्यास उत्सुक असेल.सलग तीन सामने जिंकून विजयी आघाडी घेतलेल्या भारताने चौथ्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी दिली. मात्र, यजमानांना २१ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, यामुळे संघाची सलग ९ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. त्यामुळे टी२० मालिकेआधी पुन्हा एकदा विजयी लय मिळविण्यासाठी, अखेरचा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया त्वेषाने खेळणार हे नक्की.