जोहान्सबर्ग : कर्णधार तेम्बा बावुमा याची वनडे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर कर्णधारपदावरुन उचलबांगडी झाली. बावुमा आणि वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा यांना दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली. हे दोघेही केवळ कसोटी मालिकेत खेळतील. एडन मार्कराम हा मर्यादित षटकांच्या सामन्यात संघाचा नवा कर्णधार असेल.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारत तीन टी-२०, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरुवात दरबन येथे १० डिसेंबरला पहिल्या टी-२० सामन्याद्वारे होईल. सीएसएने सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार, बावुमा आणि रबाडा यांना मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली. दोघेही नंतर कसोटी मालिकेत परततील. भारत आणि दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीसी २०२३-२५ च्या तयारीला लागले आहेत.
एक वनडे आणि १६ टी-२० सामने खेळलेला यष्टिरक्षक - फलंदाज ट्रिस्टन स्टब्स हा प्रथमच कसोटी संघात आला तर हेन्रिक क्लासेनला कसोटीतून वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी, मार्को यान्सेन आणि लुंगी एन्गिडी यांनाही वनडे संघातून वगळण्यात आले. वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमॅन आणि अष्टपैलू मिहलाली मपोंगवाना हे नवे चेहरे आहेत.
टी-२० संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीट्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, (पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० साठी), डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन (पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० साठी), हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी (पहिल्या आणि दुसऱ्या टी-२० साठी), एंडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विलियम्स.
वनडे संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जोरजी, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, एंडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, रासी वान डेर दुसेन, काइल व्हेरेन आणि लिझाद विलियम्स.
कसोटी संघ : तेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंघम, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जोरजी, डीन एल्गर, मार्को यान्सेन, केशव महाराज, एडन मार्कराम, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी, कीगन पीटरसन, कॅगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल व्हेरेन.
भारत- द. आफ्रिका टी-२० मालिकापहिली टी-२० दरबन १० डिसेंबर रात्री ९.३० पासूनदुसरी टी-२० केबेरा १२ डिसेंबर रात्री ९.३० पासूनतिसरी टी-२० जोहान्सबर्ग १४ डिसेंबर रात्री ९.३० पासून
वनडे सामन्यांची मालिकापहिला सामना जोहान्सबर्ग १७ डिसेंबर दुपारी १.३० पासूनदुसरा सामना केबेरा १९ डिसेंबर दुपारी ४.३० पासूनतिसरा सामना पार्ल २१ डिसेंबर दुपारी ४.३० पासून
कसोटी सामन्यांची मालिकापहिली कसोटी सेंच्युरियन २६-३० डिसेंबर दुपारी १.३० पासूनदुसरी कसोटी केपटाऊन ३-७ जानेवारी दुपारी २ पासून