Join us  

भारतात 'बॅझबॉल'चे पितळ उघडे पडले; ब्रेंडन मॅक्युलमची जाहीर कबुली

या शैलीत काही आमूलाग्र बदलाची गरज असल्याचेही मान्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 9:59 AM

Open in App

धर्मशाला : भारताविरुद्ध अतिआक्रमकवृत्तीचा निभाव लागू शकला नाही. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-४ असा पराभव पदरी पडल्यानंतर इंग्लिश क्रिकेट संघाचे डोळे उघडले आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी तर या दौऱ्यात आमच्या बेंझबॉल शैलीचे पितळ उघडले पडल्याची जाहीर कबुली देत या शैलीत काही आमूलाग्र बदलाची गरज असल्याचेही मान्य केले आहे.

ब्रिटिश माध्यमांशी संवाद साधताना मॅक्युलम म्हणाले, 'आमच्या शैलीतील उणीव चव्हाट्यावर आल्याने आत्मचिंतनाद्वारे शैलीत बदल करावेच लागतील. भारताने आमच्यावर वर्चस्व गाजविले आणि आम्ही डरपोक होत गेलो. खेळात प्रत्येक क्षेत्रात भारतीय खेळाडू आमच्या तुलनेत सरस ठरले.'

बेंझबॉल स्वीकारल्यानंतर इंग्लंडचा हा पहिला मालिका पराभव आहे. बेन स्टोक्स आणि सहकारी मागील तीन मालिका जिंकण्यात अपयशी ठरल्याने बेंझबॉलवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावर ४२ वर्षांचे मॅक्युलम पुढे म्हणाले, 'पुढील काही महिने आम्ही यावर काम करू. पुढील सत्रात खेळण्याआधी उणिवा दूर सारल्या जातील. भारताने आम्हाला आमच्या शैलीत खेळण्यापासून रोखले. आम्हाला स्वतःच्या शैलीची समीक्षा करावी लागेल आणि सुधारणा घडवून आणावी लागेल.'

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ