इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL 2020) १३वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. आयपीएलनंतर पाकिस्तान सुपर लीगच्या ( PSL) प्ले ऑफ सामनेही खेळवण्यात आले. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बिग बॅश लिगची ( Big Bash League)...ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत.
बीबीएलचे हे १०वे पर्व आहे आणि १० डिसेंबरपासून या लीगला सुरूवात होणार आहे. १० डिसेंबरला ब्लंडस्टोन अरेनावर हॉबर्ट हरिकेन्स विरुद्ध सिडनी सिक्सेस यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. तत्पूर्वी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात सिडन सिक्सर्स ( Sydney Sixers)च्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या डॅन ख्रिस्टियननं ( Dan Christian) तुफान फटकेबाजी केली.
सिडनी थंडर ( Sydney Thunder) संघाविरुद्ध त्यानं ३३ चेंडूंत शतक झळकावले. त्याच्या १० षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर सिक्सर्सने ७ बाद २०० धावा केल्या. थंडरने हे लक्ष्य सात विकेट्सच्या मोबदल्यात आणि दोन चेंडू राखून पार केले. ख्रिस्टियननं दोन विकेटही घेतल्या. डॅननं २०१८मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे (
दिल्ली कॅपिटल्स) प्रतिनिधित्व केले होते. आयपीएलमध्ये त्यानं ४० सामन्यांत ४४६ धावा आणि ३४ विकेट्स घेतल्या आहेत.
काय आहेत हे तीन नवीन नियम ?
Power Surge - या नियमानुसार सहा षटकांचा पहिला पॉवर प्ले हा चार षटकांचा केला गेला आहे. उर्वरित दोन षटकांचा पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो. पण, त्यांना ११व्या षटकानंतरच पॉवर प्लेमधील दोन षटकांचा पॉवर प्ले घेता येणार आहे. त्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त दोनच खेळाडू सर्कल बाहेर ठेवता येतील.
X-factor Player - हा खूप मजेशीर नियम आहे. आता कर्णधारांना ११ खेळाडूंची नव्हे तर १२ किंवा १३ खेळाडूंची अंतिम यादी तयार करावी लागणार आहे. त्यानुसार सामन्याच्या १०व्या षटकानंतर १२ वा किंवा १३ वा खेळाडूपैकी कोणीही अंतिम ११मधील एका खेळाडूला रिप्लेस करू शकतो. पण, अट अशी राहिल की ज्या खेळाडूला बदली करणार आहे, त्यानं फलंदाजी केलेली नसावी किंवा एकपेक्षा अधिक षटक टाकलेलं नसावं.
Bash Boost - या नियमाचा दोन्ही संघांना समान फायदा असेल. डावाच्या मध्यंतराला दोन्ही संघाला बोनस गुण मिळवण्याची संधी आहे. जर एखादा संघ धावांचा पाठलाग करत असेल आणि त्यानं लक्ष्य ठेवणाऱ्या संघाच्या १०व्या षटकानंतरच्या धावांपेक्षा अधिक धावा पहिल्या १० षटकांत केल्या, तर त्यांना १ बोनस गुण मिळेल. तसंच लक्ष्याचा बचाव करणाऱ्या संघाच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघानं १० षटकांत कमी धावा केल्या, तर पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला तो बोनस गुण मिळेल.
Web Title: BBL 10 : Daniel Christian smashes 33-ball century with 10 sixes for Sydney Sixers against Sydney Thunder
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.