BBL 10 : चूक अम्पायरची अन् सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला भरावा लागला अडीच लाखांचा दंड, Video

सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात मार्शला यष्टिरक्षकाच्या हातून झेलबाद दिले. पण, अम्पायरचा हा निर्णय चुकीचा होता.

By स्वदेश घाणेकर | Published: February 1, 2021 11:02 AM2021-02-01T11:02:04+5:302021-02-01T11:02:17+5:30

whatsapp join usJoin us
BBL 10: Mitchell Marsh gets fined $5,000 after showing dissent over umpire's decision | BBL 10 : चूक अम्पायरची अन् सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला भरावा लागला अडीच लाखांचा दंड, Video

BBL 10 : चूक अम्पायरची अन् सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजाला भरावा लागला अडीच लाखांचा दंड, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ स्कॉचर्सचा ( Perth Scorchers) अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला ( Mitchell Marsh) सोमवारी ५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 2,78,844 रुपयांचा दंड भरावा लागला. बिग बॅश लीग ( BBL 10) च्या शनिवारी झालेल्या सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना मिचेल मार्श चांगलाच भडकला आणि तो लेव्हल २ च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.  World Record : ६,६,६,६,६,६,६,६,६,६,६,६; KXIPच्या फलंदाजाचा T10 लीगमध्ये षटकारांचा पाऊस, Video


सिडनी सिक्सर्सविरुद्धच्या सामन्यात मार्शला यष्टिरक्षकाच्या हातून झेलबाद दिले. पण, अम्पायरचा हा निर्णय चुकीचा होता. मार्शची बॅट आणि चेंडू यांच्यात कोणताच संपर्क न झाल्याचे स्पष्ट दिसत होते. BBL मध्ये DRS नसल्यामुळे अम्पायरचा निर्णय अंतिम.. मार्शला मात्र हा निर्णय पटला नाही आणि त्यानं अम्पायरकडे पाहून रागात अपशब्द उच्चारले. इंग्लंडचा फलंदाज बेन स्टोक्स यानंही या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. 

''मॅच रेफरी बॉब स्ट्रॅटफोर्ड यांनी कलम २.८ अंतर्गत मार्शला दोषी ठरवले आहे आणि त्यानंही चूक मान्य करून ५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर दंड भरण्याचे मान्य केले,''असे क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितले. IPL Auction 2021 : मोहम्मद अझरुद्दीनसह १० अनकॅप खेळाडूंसाठी फ्रँचायझी पाडणार पैशांचा पाऊस!

Web Title: BBL 10: Mitchell Marsh gets fined $5,000 after showing dissent over umpire's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.