Big Bash League 2021ला आजपासून सुरूवात झाली आणि पहिल्याच सामन्यात सिडनी सिक्सर्स संघानं ( Sydney Sixers) विक्रमी कामगिरी करून दाखवली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात BBLमधील सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला गेला. सिडनी सिक्सर्कच्या फलंदाजांनी मेलबर्न स्टार्स ( Melbourne Stars) संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. सिडीन मैदानावर घरच्या संघानं २३ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी केली आणि त्यात चमकला तो RCBनं नुकताच रिलिज केलेला जोश फिलिप ( Josh Philippe).... त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर सिडनी सिक्सर्सनं ४ बाद २१३ धावा कुटल्या.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आतापर्यंत हिट संघानं दोन वर्षांपूर्वी ४ बाद २०९ धावा चोपून सर्वोत्तम खेळीची नोंद केली होती. तो विक्रम आज सिडनी सिक्सर्सनं मोडला. प्रथम फलंदाजी करताना फिलिप, जेम्स विंस व कर्णधार मोईजेस हेन्रिक्स यांची फटकेबाजी पाहायला मिळाली. २०२०च्या आयपीएलमध्ये RCBकडून ५ सामन्यांत ७८ धावा करणाऱ्या फिलिपनं ४७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावा कुटल्या. विंसनं ४४ धावांची खेळी केली. तर हेन्रिक्सनं ३८ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ७६ धावा चोपल्या. या तिघांनीच संघाला ४ बाद २१३ हा मोठा पल्ला गाठून दिला.
आयपीएल २०२२साठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी) यांना रिटेनं करून पर्समधील 57 कोटी रक्कम वाचवली.