Glenn Maxwell's one-handed catch : बिग बॅश लीगमध्ये ( Big Bash League) रविवारी ब्रिस्बन हिट विरुद्ध मेलबर्न स्टार्स ( Brisbane Heat Vs Melbourne Stars) यांच्यातल्या सामन्यात अफलातून झेल पाहायला मिळाला. ग्लेन मॅक्सवेलन हा भन्नाट कॅच घेतला आणि गोलंदाजासह त्याला स्वतःला यावर विश्वास बसत नव्हता. ब्रिस्बन हिट संघाचा डाव सुरू असताना १६व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा झेल उडाला अन् मॅक्सवेलनं साऱ्यांना अवाक् केले. नॅथन कोल्टर नायलनं टाकलेला चेंडू सॅम हिझलेट्टनं मिड ऑनच्या वरून टोलवण्याचा प्रयत्न केला. पण, मॅक्सवेल उलट्या दिशेनं धावला अन् डाव्या हातानं अफलातून झेल टिपला. ही कॅच घेतल्यानंतर मॅक्सवेल स्वतः स्तब्ध उभा राहिला अन् त्यानं तोंडावर हात ठेवला. त्याला स्वतःलाही हा कॅच टिपलाय यावर विश्वास बसला नव्हता.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ब्रिस्बन हिटला कर्णधार ख्रिस लीन व नॅथन मॅकस्वीनी यांनी अर्धशतकी सलामी मिळवून दिली. लिन २८ व मॅकस्वीनी २० धावांवर माघारी परतला. त्यानं बेन डकेटनं ४२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांच्या सहाय्यानं ५१ धावांची खेळी केली. लॅचलॅन प्फेफर ( ११) व सॅम ( ९) यांना फार कमाल करता आली नाही. मॅक्सवेलनं १६व्या षटकात हा भारी झेल घेऊन ब्रिस्बन हिट संघाला मोठा धक्का दिला. त्यांना २० षटकांत ६ बाद १४९ धावा करता आल्या. ग्लेन मॅक्सवेल व अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
पाहा व्हिडीओ..