बिग बॅश लीगमध्ये ( BBL 10) सोमवारी मेलबर्न स्टार्स ( Melbourne Stars) संघानं १० धावांनी हॉबर्ट हरीकन्स ( Hobart Hurricanes ) संघावर मात केली. मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis ) आणि बेन मॅकडेर्मोट ( Ben McDermott ) या दोन्ही प्रतिस्पर्धी फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली. पण, या दोघांच्या खेळीपेक्षा हा सामना गाजला तो आंद्रे फ्लेचर याच्या दोन अफलातून कॅचमुळे...
प्रथम फलंदाजी करताना मेलबर्न स्टार्सनं ६ बाद १८३ धावा चोपल्या. सलामीला आलेल्या मार्कस स्टॉयनिसनं ५५ चेंडूंत ७ चौकार व ७ षटकार खेचून नाबाद ९७ धावा चोपल्या. हिल्टन कार्टराइट ( ३६) आणि निकोलस पूरन ( २६) यांनी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी केली. हरीकन्सच्या नॅथन एलिसनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना हरीकन्सकडून तोडीसतोड उत्तर मिळालं. सलामीवीर बेन मॅकडेमोर्टची बॅट चांगलीच तळपली. मॅकडेमोर्ट एकहाती सामना खेचून नेणार असेच चित्र होते, पण आंद्रे फ्लेचरच्या अफलातून झेलनं ते पालटले. मॅकडेमोर्ट ५८ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकार मारून ९१ धावांवर १९ व्या षटकात बाद झाला. तत्पूर्वी फ्लेचरनं कॉलिन इंग्रामचा अफलातून झेल घेतला.
पाहा सुपर झेल...
Web Title: BBL10 : Marcus Stoinis and Ben McDermott put on a T20 batting clinic but the catches from the Andre Fletcher stole the show, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.