भारतीय क्रिकेट विश्वासाठी मोठी बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआ) भारतीय महिला आणि पुरूष क्रिकेट संघाला ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची तयारी दाखवली आहे. ऑलम्पिक परिषदेनं जर क्रिकेटचा ऑलम्पिक स्पर्धेत समावेश केला तर लॉस अँजलिसमध्ये २०२८ साली होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ (महिला आणि पुरूष) पाठविण्यात येतील असा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. त्यामुळे ऑलम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत बीसीसीआयनं आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. (BCCI agrees to field both mens and womens team if Los Angeles Olympics includes cricket)
इतकंच नव्हे, तर २०२२ साली बर्मिंघममध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा महिला क्रिकेट संघ सहभागी होणार आहे. याशिवाय २०२१ साली मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. नुकतंच बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची व्हिडिओ कॉन्फरिन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
"भारतीय महिला क्रिकेट संघ बर्मिंघममध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होणार आहे. क्रिकेटचा ऑलम्पिकमध्ये समावेश झाला तर २०२८ सालच्या लॉस अँजलिस ऑलम्पिकमध्ये महिला आणि पुरूष असे दोन्ही भारतीय संघ स्पर्धेत सहभाग घेतील", अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
Web Title: BCCI agrees to field both mens and womens team if Los Angeles Olympics includes cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.