भारतीय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी BCCI आणि Master Card चा 'मास्टर स्ट्रोक'

महिला क्रिकेटनेही मागील काही वर्षांत आपला स्तर उंचावून जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडले आहे. BCCI आणि MasterCard  यांनीही महिला क्रिकेटकडे चाहत्यांची पावले वळण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबवला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 02:51 PM2022-12-13T14:51:37+5:302022-12-13T14:52:18+5:30

whatsapp join usJoin us
BCCI and Master Card Collaborate in a Master Stroke Move to Promote Indian Women's Cricket | भारतीय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी BCCI आणि Master Card चा 'मास्टर स्ट्रोक'

भारतीय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी BCCI आणि Master Card चा 'मास्टर स्ट्रोक'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीयांसाठी क्रिकेट म्हणजे एखादा उत्सवच. मग ती वन डे मॅच असो, ट्वेंटी-२० असो किंवा अगदी कसोटी मॅचही असो, चाहते आपापल्या परीने जमेल तसं क्रिकेटला फॉलो करतात. कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी ते अगदी विराट कोहली व रोहित शर्मा यांना देव म्हणून पूजण्यातही चाहते कमी पडले नाही. पुरुष क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या फॅन बेसच्या १०-२० टक्केच महिला क्रिकेटला चाहतावर्ग दिसत होता, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. BCCI ने नुकतेच महिला व पुरुष क्रिकेटपटूंना समान मॅच फी देण्याचे जाहीर केले. आता तर आगामी रणजी करंडक स्पर्धेत महिला अम्पायर्सही दिसणार आहेत. बोर्डाने त्याला मान्यता दिली आहे. महिला क्रिकेटनेही मागील काही वर्षांत आपला स्तर उंचावून जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडले आहे. BCCI आणि MasterCard  यांनीही महिला क्रिकेटकडे चाहत्यांची पावले वळण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबवला आहे. महिला क्रिकेटकडे प्रेक्षकांची पावले वळावी यासाठी  BCCI आणि Master Cardचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत महिलांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होऊ घातला आहे आणि त्याची तयारी म्हणून भारतीय महिला संघ ९ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ९ ते २० डिसेंबर या कालावधीत मुंबईत पार पडणाऱ्या या ट्वेंटी-२० मालिकेत महिला क्रिकेटकडे प्रेक्षकांची पावले वळावी यासाठी  BCCI आणि MasterCardचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. महिला क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी BCCI आणि MasterCard एकत्रितपणे प्रेक्षकांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू  रेणुका सिंग, हरमनप्रीत देओल, शेफाली वर्मा यांच्यासोबत तीन लघुपट तयार केले आहेत. या लघुपटांमध्ये क्रिकेटसारख्या स्पर्धात्मक खेळातील त्यांच्या प्रवासातील महत्त्वाचे क्षण व ज्या सामाजिक, आर्थिक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला, हे दाखवण्यात आले आहे. Master Card ने ज्येष्ठ समालोचक हर्षा भोगले यांच्यासोबत या लघुपटाच्या व्हिडीओची त्यांच्या सोशल मीडियावर जाहीरात करण्यासाठी भागीदारी केली आहे. हर्षा भोगले यांनीही या मालिकेसाठी  पाठिंबा दिला आहे. भारतीय क्रिकेटने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 'रौप्य' क्रांती घडवल्यानंतर हळुहळू महिला क्रिकेट पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय आणि त्यात अधिक वाढ व्हावी यासाठी BCCIच्या मदतीला Master Card आले आहे. मिताली राजने खऱ्या अर्थाने भारतीय महिला क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिले. तिने नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण, तिच्या सानिध्यात घडलेल्या हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत आहेत आणि प्रेक्षकांच्या तोंडावर यांची नावं आहेत. 

बीसीसीआय आणि आयसीसी यांनीही महिला क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी काही पाऊलं उचलली आहेत. महिला क्रिकेट व प्रेक्षकांमधील हा दूरावा दूर करण्यासाठी Master Card ने BCCI सोबत पुढाकार घेतला आहे. MasterCard महिला क्रिकेटपटूंची यशोगाथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. महिला क्रिकेटपटूंचा सामाजिक, आर्थिक संघर्षासोबत त्यांची मेहनत आणि भारतासाठी खेळणे म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे, हे सर्व लघुपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ६०-७० सेकंदाचे हे तीन लघुपट असणार आहेत.  स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज, हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा, मिताली राज, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, शिखा पांडे, मेघना सब्बिनेनी, दीप्ती शर्मा,  स्नेह राणा आदी महिला क्रिकेटपटूंचा प्रवास या माध्यमातून क्रिकेटप्रेमींसमोर ठेवण्यात येणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली महिला ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका ९ ते २० डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे आणि Star Sports वर मॅच लाईव्ह पाहता येणार आहे. BCCI आणि MasterCard एकत्रित येऊन महिला क्रिकेटला यशस्वी करण्यासाठी हातभार लावत आहेत.  

भारत व ऑस्ट्रेलिया महिला ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक 

  • पहिला सामना - ९ डिसेंबर २०२२, सायंकाळी ७ वा. पासून, डी वाय पाटील स्टेडियम 
  • दुसरा सामना - ११ डिसेंबर २०२२, सायंकाळी ७ वा. पासून, डी वाय पाटील स्टेडियम 
  • तिसरा सामना - १४ डिसेंबर २०२२, सायंकाळी ७ वा. पासून, सीसीआय, मुंबई 
  • चौथा सामना - १७ डिसेंबर २०२२, सायंकाळी ७ वा. पासून, सीसीआय, मुंबई 
  • पाचवा सामना - २२ डिसेंबर २०२२, सायंकाळी ७ वा. पासून, सीसीआय, मुंबई 

Web Title: BCCI and Master Card Collaborate in a Master Stroke Move to Promote Indian Women's Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.