इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहली आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांना मोठा झटका बसला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, यामुळे बीसीसीआय अत्यंत नाराज असून या दोघांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
या व्हायरल फोटोमुळे वाद -भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलै ते 17 जुलै दरम्यान एक कसोटी, 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले आहेत. यादरम्यान त्यांनी मास्क न लावताच चाहत्यांसोबत सेल्फीही क्लिक केले आहेत. रोहित आणि विराटच्या या कृत्यामुळे बीसीसीआय प्रचंड नाराज आहे.
BCCI लवकरच घेणार मोठी अॅक्शन -संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अशा कृत्यामुळे बोर्ड नाराज असून या दोन्ही क्रिकेटर्सना लवकरच इशारा देण्यात येणार आहे. बीसीसीआयचे कोशाध्यक्ष अरुण धुमल यांनी इनसाइडस्पोर्ट्ससोबत बोलताना म्हटले आहे, की 'इंग्लंडमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी, खेळाडूंनी अधिक काळजी घ्यायला हवी. आम्ही संघातील खेळाडूंना थोडे सावध राहण्यास सांगू. एवढेच नाही, तर रोहित आणि विराट यांनी मास्क न लावताच शॉपिंग देखील केल्याचे वृत्त होते.