नवी दिल्ली - 5 जानेवारी 2018पासून भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचा 3 कसोटी, 6 वन-डे आणि 3 टी-20 असा कार्यक्रम असणार आहे. कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतर बीसीसीआयने शनिवारी (23 डिसेंबर) वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
श्रीलंकेविरुद्ध मालिकेत विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहलीचं वन-डे संघात कर्णधार म्हणून पुनरागमन झालं आहे. याचसोबत मुंबईकर अजिंक्य रहाणेलाही राखीव सलामीवीराच्या भूमिकेत संघात जागा मिळाली आहे. परदेशी खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेची कामगिरी लक्षात घेता त्याला संघात जागा मिळाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याव्यतिरीक्त टी-२० मालिकेत चांगली कामगिरी करुनही लोकेश राहुलला आफ्रिकेविरुद्ध संघात जागा मिळू शकलेली नाहीये, तर दुसरीकडे श्रेयस अय्यर, मनिष पांडे आणि दिनेश कार्तिक यांनी संघात आपली जागा कायम राखलेली आहे. याव्यतिरीक्त अक्षर पटेलचीही संघात निवड करण्यात आलेली आहे. निवड समितीने यावेळीही युवराज सिंह, सुरेश रैना यांना संघात जागा दिलेली नाही. तर फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजाही संघात नाहीत.
दक्षिण आफ्रिका दौरा खडतर : माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत ‘विराट कोहली आणि त्याचा संघ सध्या प्रतिस्पर्धी संघांना लोळवण्याच्या निर्धाराने खेळत आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात अभूतपूर्व कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला असाच खेळ करावा लागेल,’ असे मत भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक लालचंदराजपूत यांनी व्यक्त केले. ५ जानेवारीपासून सुरू होणा-या दक्षिण आफ्रिका दौºयात भारतीय संघ तीन कसोटी, ६ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून विराट कोहलीपुढे हे सर्वांत खडतर आव्हान असेल.भारतीय संघाला अत्यंत मजबूत मानताना राजपूत यांनी म्हटले की, ‘ज्याप्रकारे भारतीय संघ क्रिकेट खेळत आहे, ते अत्यंत कठोर आहे. कर्णधार म्हणून विराट कोहली जी आक्रमकता दाखवत आहे, त्याचाच परिणाम संघातील खेळाडूंवरही झाला आहे. त्यामुळेच सध्याचे भारतीय खेळाडू कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याचा निर्धार करत आहेत. प्रतिस्पर्धी संघांना उद्ध्वस्त करण्यास टीम इंडिया खेळत आहे.’ आगामी दक्षिण आफ्रिका दौºयाविषयी राजपूत यांनी म्हटले की, ‘सध्याच्या संघात चमत्कार करण्याची क्षमता आहे.