Join us  

टीम इंडियाचा इंग्लंड दौराही ठरला! इथं पाहा कधी अन् कुठे रंगणार सामने

बीसीसीआयने भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय नियमाक मंडळाच्या (BCCI) अधिकृत X अकाउंटवरुन शेअर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 3:01 PM

Open in App

बीसीसीआयने भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय नियमाक मंडळाच्या (BCCI) अधिकृत X अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या ट्विटनुसार भारतीय संघ पुढच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 

कधी रंगणार इंग्लंड आणि भारत यांच्यातील ही कसोटी मालिका? 

इंग्लंड आणि भारत यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २० जून, २०२५  ते ४ ऑगस्ट, २०२५ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. हेडिंग्ले, लीड्सच्या मैदानातून भारतीय संघ या दौऱ्याची सुरुवात करेल. या मालिकेतील शेवटचा सामना लंडनच्या मैदानातील अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्याने होईल. 

असे आहे भारतीय संघाचे इंग्लंड दौऱ्यावरील वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना - २० ते २४ जून, २०२५ (हेडिंग्ले, लीड्स)
  • दुसरा कसोटी सामना- २ जुलै ते ६ जुलै, २०२५ (एजबेस्टन, बर्मिंघम) 
  • तिसरा कसोटी सामना -१० ते १४ जुलै, २०२५ (लॉर्ड्स, लंडन)
  • चौथा कसोटी सामना-  २३ ते २७ जुलै, २०२५ (ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर)
  • पाचवा कसोटी सामना- ३१ जुलै ते ४ ऑगस्ट (ओव्हल, लंडन)

 

पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान 

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. याआधी भारतीय संघाने २०२०-२१ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. पाच सामन्यांची ही कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली होती. त्याआधी २०१८ मध्ये भारतीय संघाला ५ सामन्यांच्या मालिकेत ४- अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय २०१४ मध्ये भारतीय संघाने ५ सामन्यांची मालिका ३-१ अशी गमावली होती. २०११ मध्ये इंग्लंडने टीम इंडियाला ४- असा व्हाइट वॉश दिला होता. गत इंग्लंड दौऱ्यात मालिका अनिर्णित राखून टीम इंडियाने पराभवाची मालिका खंडित केली आहे. आता इंग्लंडच्या मैदानात कसोटी मालिका जिंकून दाखवण्याचे मोठे चॅलेंज या दौऱ्यात टीम इंडियासमोर असेल.

रोहितच कॅप्टन असणार?

इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्माच भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल, असे संकेत बीसीसीआयने या दौऱ्याची माहिती देताना दिले आहेत. कारण रोहित शर्माचा फोटो शेअर करत आगामी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रोहित शर्मानं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर छोट्या फॉर्मेटमध्यून निवृत्ती घेतली आहे. पण वनडे आणि कसोटी संघात पुढील काही काळ तोच नेतृत्व करताना दिसेल, हे संकेतही बीसीसीआयने दिले आहेत. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघइंग्लंडबीसीसीआय