सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 1947 सालापासून ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयाच्या कोऱ्या पाटीवर विराट कोहलीच्या संघाने विजयाची मोहोर उमटवली. भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच देशात 2-1 अशा फरकाने पराभूत करण्याचा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) खेळाडूंना मालामाल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघातील प्रत्येक खेळाडूला भरभरून रोख रक्कम देण्याची घोषणा बीसीसीआयने मंगळवारी केली.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने मंगळवारी रोख बक्षीस जाहीर केले. त्यानुसार विजयी संघातील अंतिम अकरा खेळाडूला प्रत्येकी 15 लाख रुपये मिळणार आहेत. राखीव खेळाडूंना प्रत्येकी 7.5 लाख रुपये मिळणार आहेत. या बक्षीस रकमेचा सर्वाधिक लाभ मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना झाला आहे. त्यांच्यासह अनय प्रशिक्षकांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळणार आहेत. अन्य सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासकीय समितीने केली.
Web Title: BCCI announces cash awards after India wins Test series against Australia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.