Join us  

मोठी बातमी! IPL 2023 ची फायनल नरेंद्र मोदी स्टेडियमवर; धोनीच्या घरच्या मैदानावर 2 प्ले ऑफ सामने

ipl 2023 final match venue : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्लेऑफच्या सामन्यांचे ठिकाण जाहीर झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 7:38 PM

Open in App

ipl 2023 final match stadium । मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टाटा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ (TATA IPL 2023) च्या प्लेऑफच्या सामन्यांचे ठिकाण जाहीर केले आहे. २३ आणि २९ मे दरम्यान हे सामने खेळवले जातील. चेन्नई आणि अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रत्येकी २-२ सामने होणार आहेत. क्वालिफायर एकचा सामना २३ मे रोजी चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे होईल आणि त्यानंतर 24 मे रोजी एलिमिनेटरचा सामना याच मैदानावर पार पडेल. 

दरम्यान, अहमदाबादमधीलनरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 26 आणि 28 मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर 2 आणि TATA IPL फायनल होणार आहे. खरं तर आयपीएल २०२३च्या सलामीचा सामना देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला होता आणि अंतिम सामना देखील याच मैदानावर होणार आहे. एक लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेले हे मैदान जगातील सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३नरेंद्र मोदी स्टेडियमचेन्नईअहमदाबादमहेंद्रसिंग धोनीबीसीसीआय
Open in App