women premier league 2023 । मुंबई : महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. काल महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईत लिलाव पार पडला. पाच फ्रँचायझींनी 87 खेळाडूंवर 59.50 कोटी रुपये खर्च करून पहिला WPL लिलाव संपवला. BCCI ने लिलावासाठी 409 खेळाडूंची निवड केली होती, ज्यात 270 भारतीयांचा समावेश होता. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला प्रीमियर लीग (WPL) 2023 चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे संघ रिंगणात असणार आहेत. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली, तिला आरसीबीच्या फ्रँचायझीने 3.40 कोटीमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.
स्मृती मानधनावर पैशांचा वर्षाव
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 3.40 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने 1.80 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. याशिवाय मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या नॅट शीव्हर ब्रंटला 3.20 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले.
4 तारखेपासून रंगणार थरार
लक्षणीय बाब म्हणजे महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात एकूण 20 लीग सामने आणि 2 प्लेऑफ सामने होतील, जे 23 दिवसांच्या कालावधीत खेळवले जातील. लीगची सुरुवात 4 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने होईल. रविवार 5 मार्च 2023 रोजी, WPL चा पहिला डबल-हेडर डे असेल. जिथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सशी होईल. तर यूपी वॉरियर्सचा लीगमधील पहिला सामना गुजरात जायंट्सविरुद्ध संध्याकाळी डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल.
महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक -
- 4 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात
- एकूण 22 सामने
- 4 दुहेरी लढती
- डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने.
- ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने.
- 26 मार्चला अंतिम सामना
ज्या दिवशी दोन सामने असतील त्यातील पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. संध्याकाळी सर्व सामने 7.30 वाजता सुरू होतील. तसेच मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर प्रत्येकी 11-11 सामने होणार आहेत. विशेष बाब म्हणजे 21 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियम यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लीग टप्प्यातील अंतिम सामना खेळवला जाईल. तर 24 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर एलिमिनेटरचा सामना होणार आहे. महिला प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.
WPLच्या पहिल्या हंगामासाठी सर्व 5 संघ खालीलप्रमाणे -
दिल्ली कॅपिलट्सचा -
मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, लॉरा हॅरीस, जेसिया अख्तर, मॅरिझन्ने कॅप, शिखा पांडे, राधा यादव, मिन्नू मनी, तितास साधू, तारा नॉरिस, एलिसे कॅप्स, जेस जॉनासेन, स्नेह दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मोंडला, पूनम यादव, तानिया भाटीया
यूपी वॉरियर्स -
दीप्ती शर्मा, एस यशश्री, सोफी एक्लेस्टन, लक्ष्मी यादव, ताहलिया मॅग्राथ, देविका वैद्य, शबनिम इस्मैल, ग्रेस हॅरीस, एलिसा हिली, लॉरेन बेल, अंजली सर्वणी, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, सिमरन शेख, पार्श्नवी चोप्रा.
गुजरात जायंट्स -
ॲश्ली गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, ॲनाबेल सदरलँड, मोनिका पटेल, डिएंड्रा डॉटीन, सबिनेनी मेघना, सोफीया डंक्ली, सुष्मा वर्मा, हर्लीन देओल, हर्ली गाला, स्नेह राणा, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वरेहम, परुणिका शिसोदिया, तनुजा कनवर, शबमन शकिल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -
स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार.
मुंबई इंडियन्सचा संघ -
हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: BCCI announces schedule for Women’s Premier League 2023, know here all details of wpl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.