बीसीसीआयकडून क्रिकेटपटूंसोबत करण्यात येणाऱ्या वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये काही धक्कादायक फेरबदल करण्यात आलेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाचं मध्यवर्ती करारामध्ये प्रमोशन झालं असून, त्याचा ए प्लस खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर हार्दिक पांड्यालाही बढती देत त्याचा बी श्रेणीतून ए श्रेणीत समावेश कऱण्यात आला आहे.
यातील एक धक्कादायक बाब म्हणजे अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, रिद्धिमान साहा, मयांक अग्रवाल यांना मध्यवर्ती करारामधून वगळण्यात आलं आहे. मात्र दुखापतीमुळे बरेच दिवस असलेल्या जयप्रीत बुमराह याला मात्र ए प्लस श्रेणीत कायम ठेवण्यात आलंय. यामध्ये काही खेळाडूंतं प्रमोशन तर काहींचं डिमोशन करण्यात आलं. दरम्यान, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांना बाहेर करण्यात आलंय. यावरून आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे दरवाजे बंदच झाल्याचे संकेत बीसीसीआयनं दिलेत. ३४ वर्षीय इशांत शर्मांनं आपला अखेरचा सामना २०२१ मध्ये न्यूझीलंडविरोधात खेळला होता. तर ३४ वर्षीय अजिंक्य रहाणे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यांपासूनच संघाच्या बाहेर आहे. भुवनेश्वर कुमार, हनुमा विहारी, दीपक चाहर, रिद्धिमान साहा सारख्या खेळाडूंनाही या लिस्टमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. तर दुसरीकडे केएल राहुल, शार्दुल ठाकूरसारख्या खेळाडूंना झटका देण्यात आला असून त्याचं डिमोशन करण्यात आलंय.
अक्षर पटेर, सूर्याला मेहनतीचं फळहार्दिक पांड्या, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात उत्तम कामगिरी केली. तर जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंह, इशान किशन आणि केएस भरत पहिल्यांदाच या लिस्टमध्ये सामील झालेत.
करारांची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे आहे ए प्लस श्रेणी (७ कोटी वार्षिक) - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.ए श्रेणी (५ कोटी वार्षिक) - हार्दिक पांड्या, आर. अश्विन, मोहम्मद शमी, रिषभ पंत, अक्षर पटेल. बी श्रेणी (३ कोटी वार्षिक) - चेतेश्वर पुजारा, के. एल राहुल. श्रेयस अय्यर. मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल. सी श्रेणी (१ कोटी वार्षिक) - उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, के.एस. भरत.