इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) 4000 कोटींच्या नुकसानाची चिंता लागली आहे. यातच बीसीसीआयला शुक्रवारी मोठा धक्का बसला आहे. आयपीएल 2009चा विजेत्या डेक्कन चार्जर्स संघाचा करार चुकीच्या पद्धतीनं रद्द केल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या लवादानं बीसीसीआयच्या विरोधात निर्णय देताना त्यांना 4800 कोटींचा दंड ठोठावला आहे. (Deccan Chargers)
बीसीसीआयने तातडीने प्रशासकीय समितीची बैठक बोलावत 15 सप्टेंबर 2012मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्धचा करार मोडीत काढला होता. आर्थिक व्यवहार योग्यपणे न हाताळण्याचे कारण बीसीसीआयने दिले होते. या निर्णयाविरोधात डेक्कन चार्जर्स संघानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सी. के. ठक्कर यांची नियुक्ती केली होती. त्यांनी हा दंड ठोठावला. बीसीसीआय या प्रकरणी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.(Deccan Chargers)
डेक्कन चार्जर्सला बीसीसीआयला राष्ट्रीयीकृत बँकेकडून 100 कोटी रुपयांची हमी मिळवून देण्यात अपयश आले होते. डेक्कन चार्जर्सने 2008मध्ये 10 वर्षांच्या कालावधीसाठी 10 कोटी 70 लाख डॉलर्सना हैदराबाद संघाची मालकी घेतली होती. दुसऱ्या वर्षी 2009 मध्ये अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेतेपद पटकावले. ''न्यायालयीन निकालाची प्रत आम्हाला अद्याप मिळालेली नाही. ती मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल,''असे बीसीसीआयचे हंगामी मुख्या कार्यकारी अधिकारी हेमांग अमीन यांनी सांगितले. (Deccan Chargers)
यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!
तीन टीम, एक मॅच; आज रंगणार क्रिकेटचा जबरदस्त सामना, जाणून घ्या संघ, वेळ अन् नियम!