Join us  

बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठरवला मेन्यू, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे मागणी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) या चुकीतून धडा घेत आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मेन्यू ठरवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 11:43 AM

Open in App
ठळक मुद्देभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 21 नोव्हेंबर ते 18 जानेवारी या कालावधीत मालिका होणार आहे.

मुंबई : नुकत्याच झालेल्या इंग्लंद दौऱ्यात भारतीय संघाच्या मेन्यूत बीफ असल्याचे दिसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) या चुकीतून धडा घेत आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मेन्यू ठरवला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाच्या मेन्यूत बीफ असू नये, अशी विनंती बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

भारतीय संघ ऑगस्टमध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी बीसीसीआयने ट्विटर हँडलवर संघाचा लंच मेन्यूचा फोटो पोस्ट केला होता. त्यात 'ब्रेस्ड बीफ पास्ता' चा समावेश होता आणि त्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. त्यामुळेच आता बीसीसीआयने सावध पवित्रा घेतला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 21 नोव्हेंबर ते 18 जानेवारी या कालावधीत 3 ट्वेंटी-20, चार कसोटी आणि 3 वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.  

टॅग्स :बीसीसीआयभारतआॅस्ट्रेलिया