Join us  

विश्वविजेत्या Team India ला मिळालेल्या बक्षिसाचे 'भारी' वाटप; इतर कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ!

टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या धरतीवर ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला.

By ओमकार संकपाळ | Published: July 08, 2024 12:48 PM

Open in App

BCCI 125 Crore Prize Money : विश्वविजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १२५ कोटी रूपये देण्याची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या धरतीवर ऐतिहासिक कामगिरी करताना ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला. बीसीसीआयने बक्षीस म्हणून दिलेली रक्कम खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला दिली जाईल. याशिवाय राखीव खेळाडूंना देखील याचा लाभ होईल. तसेच विश्वचषकाच्या संघाचा भाग असलेल्या पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळालेल्या यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांनाही बक्षिसातील रक्कम दिली जाईल. त्यांना इतर खेळाडूंप्रमाणे प्रत्येकी ५ कोटी रूपये मिळणार असल्याचे कळते. 

वृत्तसंस्था 'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाचे मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांना १२५ कोटी रूपयांच्या बक्षिसापैकी ५ कोटी रूपये दिले जातील. याशिवाय कोचिंग स्टाफचे सदस्य असलेले विक्रम राठोड, टी दिलीप आणि प्रसाद म्हांब्रे यांना प्रत्येकी २.५ कोटी रूपये बक्षीस म्हणून दिले जातील. बक्षिसाच्या एकूण रकमेपैकी २ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम बॅकरूम कर्मचाऱ्यांना देखील दिली जाईल, ज्यात तीन फिजिओथेरपिस्ट, तीन थ्रोडाउन स्पेशालिस्ट, दोन मालिश करणारे आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांचा समावेश आहे.

ट्वेंटी-२० विश्वचषकात राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघाचा हिस्सा असलेले रिंकू सिंग, शुबमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांना प्रत्येकी १ कोटी रूपये मिळतील. यासह अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समितील सदस्यांना देखील प्रत्येकी १-१ कोटी दिले जातील.

रिपोर्ट्सनुसार कोणाला किती रूपये मिळणार?

  • प्रत्येकी ५ कोटी - १५ खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड 
  • प्रत्येकी २.५ कोटी - प्रशिक्षक (फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी)
  • प्रत्येकी २ कोटी - फिजिओथेरपिस्ट, थ्रोडाउन स्पेशालिस्ट, मालिश करणारे आणि कंडिशनिंग
  • प्रत्येकी १ कोटी - निवडकर्ते आणि राखीव खेळाडू  
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ