मुंबई : Paytmचे मालकी हक्क असलेल्या One 97 Communications Pvt. Ltd कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) टायटल स्पॉन्सरशीप हक्क स्वतःकडे कायम राखले आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटसाठी प्रत्येकी सामना 3.80 कोटी रुपये Paytm मोजणार आहेत.
बीसीसीआयने बुधवारी ही घोषणा केली. 2015मध्ये Paytmनेच चार वर्षांसाठी टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते. ''2019-23 या कालावधीपर्यंत भारतात होणाऱ्या सामन्यांच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी 326.80 कोटींचे डील झाले आहे. प्रत्येक सामन्याला 3.80 कोटी बोली लावण्यात आली, ही रक्कम आधीच्या ( 2.4 कोटी) बोलीच्या 58% अधिक आहे, '' असे बीसीसीआयने सांगितले.