Join us  

BCCI ने सुरू केला नव्या यष्टिरक्षकाचा शोध, समोर ४ पर्याय; रिषभ पंतच्या भविष्याबाबत मोठे अपडेट्स

Rishabh Pant Health Update: आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ ला सहा महिने शिल्लक असताना भारतीय क्रिकेटला सर्वात मोठा धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 4:55 PM

Open in App

Rishabh Pant Health Update: आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ ला सहा महिने शिल्लक असताना भारतीय क्रिकेटला सर्वात मोठा धक्का बसला. भारताचा सर्वोत्तम यष्टिरक्षक रिषभ पंत ( Rishabh Pant) याचा अपघात झाला आणि तो मागील काही काळापासून दूर आहे. त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी ६-७ महिने लागण्याची शक्यता आहे. काही चमत्कार घडला, तर रिषभ ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड कप खेळताना दिसू शकतो. पण, त्याला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची आहे आणि यष्टिरक्षक म्हणून त्याचं भविष्य अधांतरी आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाने लोकेश राहुल आणि इशान किशन हे दोन यष्टिरक्षकाचे पर्यात वन डे वर्ल्ड कप साठी ठेवले आहेत.  

''रिषभ पंतच्या प्रकृतीत चांगली सुधारणआ होतेय, परंतु त्याला पुन्हा व्यवस्थित चालण्यसाठी आणि सरावाला सुरूवात करण्यासाठी किमान ६-७ महिने तरी अजून लागतील. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धा ही त्याच्यासाठी घाई ठरेल. त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त व्हावे, अशी आमची इच्छा आहे. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी बराच वेळ त्याला लागू शकतो. त्यामुळे राहुल व इशान या दोन खेळाडूंकडे यष्टिरक्षक म्हणून आम्ही पाहत आहोत,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्टला सांगितले.  

डिसेंबर महिन्यात रिषभच्या गाडीचा अपघात झाला होता आणि महिनाभर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर तो घरी परतला होता. त्याच्या गुडघ्याच्या लिगामेंटवर शस्त्रक्रिया झालेली आहे. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. पण, तो भविष्यात पुन्हा यष्टिरक्षण करू शकेल, याबाबत साशंकता आहे. यष्टिरक्षण करताना गुडघ्यावर प्रचंड ताण असतो आणि रिषभला ते आता शक्य होईल, असे वाटत नाही. त्यामुळेच बीसीसीआयने दीर्घकाळासाठी यष्टिरक्षक-फलंदाजाचा शोध सुरू केला आहे. बीसीसीआयने २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीलाही सुरुवात केली आहे आणि संजू सॅमसनचा BCCIच्या वार्षिक करारात समावेश केला आहे. इशान किशनही आहेच. केएस भरत यालाही संधी दिली जातेय.  

''रिषभने या वर्षाच्या अखेरीस स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करावे, अशी आशा आहे. पण, त्याची दुखापत पाहता त्याला यष्टिरक्षण करणे अवघड असेल. संजू, इशान, लोकेश आणि भरत हे चार यष्टिरक्षक सध्या आमच्याकडे आहे, परंतु जितेश शर्मा व अन्य खेळाडूंवरही लक्ष आहे,''असेही अधिकाऱ्याने सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :रिषभ पंतबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App