IPL 2023 Qualifier 2 MI vs GT: स्पर्धेचा चॅम्पियन कोण होणार? त्याचा निर्णय 28 मे रोजी संध्याकाळी अहमदाबादमध्ये होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जसमोर अंतिम फेरीत कोणाचे आव्हान असेल, याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. फिनालेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. BCCI ने अंतिम सामन्याची तयारी सुरू केली आहे. याआधी मुंबई आणि गुजरात यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसरा क्वालिफायर खेळला जाणार आहे, मात्र या सामन्यापूर्वी बोर्डाकडून मोठी चूक झाली, त्यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला.
बीसीसीआयच्या दुर्लक्षामुळे लोक नाराज झाले. फलक लावल्यामुळे स्टेडियमबाहेर गर्दी एवढी वाढली की कुणाची स्कूटी तुटली तर कुणी कुणाच्या अंगावर पाय दिले. बीसीसीआय आयपीएल 2023 च्या अंतिम तिकिटांची प्रक्रिया व्यवस्थापित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली.
बीसीसीआयचा निष्काळजीपणा
ऑफलाइन तिकिटांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, परंतु ज्यांनी ऑनलाइन तिकीट बुक केले होते त्यांनी काउंटरवर जाऊन क्यूआर कोड दाखवावा आणि तिथून तिकीटाची हार्ड कॉपी घ्यावी असे ठरले होते. आदल्या दिवशी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तिकीट कलेक्शनसाठी खिडकी उघडण्यात आली होती, त्यामुळे स्टेडियमबाहेर अनेकांची गर्दी झाली. चाहत्यांची गर्दी सांभाळण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.
क्वालिफायरच्या दिवशी काउंटर बंद
क्वालिफायरच्या दिवशी काउंटर बंद असेल म्हणून लोकांनी गर्दी केली. पोलिस आले असतानाही लोक एकमेकांवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. गर्दीत काही लोक खाली पडले, पण त्यांची पर्वा न करता काही जण त्यांच्या डोक्यावर अंगावर चढून पुढे जाताना दिसले. चेंगराचेंगरीत महिलाही अडकल्या. स्टेडियमबाहेर बीसीसीआयच्या या हलगर्जीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अधिकृत सूचनेनुसार, क्वालिफायर सामन्याच्या दिवशी तिकिटे दिली जाणार नाहीत. अशा परिस्थितीत आता चाहत्यांना पात्रता फेरीच्या दुसऱ्या दिवशी तिकीट काढता येणार आहे असे सांगितले जात आहे.