नवी दिल्ली : बीसीसीआय भारतातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना. गेल्या वर्षात त्यांनी कमावले आहेत ते तब्बल 25 हजार कोटी रुपये. ही रक्कम पाहून तुमचे डोळेही विस्फारले असतील. बीसीसीआयने एवढी मोठी रक्कम कमावल्यावर आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस वैगेरे दिला असेल, असे तुम्हाला वाटेल. पण परिस्थिती त्या उलट आहे. बीसीसीआयने एवढी मोठी रक्कम कमावूनही कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्येही वाढ केलेली नाही.
बीसीसीआयच्या मिळकतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आयपीएल आणि अन्य सामन्यांमधून बीसीसीआयला यावेळी भरघोस रक्कम मिळाली आहे. बीसीसीआयने काही गोष्टींवर यावर्षी जास्त खर्च केला असला तरी त्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
बीसीसीआयमधील कर्मचाऱ्यांमध्ये पगार वाढ न झाल्याने असंतोष आहे. पण पगार न वाढण्याचे कारण हे बीसीसीआयमधील अंतर्गत भांडणामध्ये दडलेले आहे. या वादाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असल्याचे समोर येत आहे.