Join us  

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली रुग्णालयात दाखल; IPL Mega Auction साठी पोहोचले होते बंगळुरूला 

Saurav Ganguly : सौरव गांगुली यांना शुक्रवारी बंगळुरूच्या नारायणा हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 10:06 PM

Open in App

BCCI Chief Saurav Ganguly : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांना शुक्रवारी कार्डिअॅक चेकअपसाठी बंगळुरू येथील नारायणा हेल्थ सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मेगा ऑक्शनसाठी सौरव गांगुली बंगळुरूत दाखल झाले होते. शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून लिलावाला सुरूवात होणार आहे.

सध्या रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, हा नियमित तपास असल्याचंही म्हटलं जात आहे. गेल्या वर्षी गांगुली यांना छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर दोनवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली होती.

गेल्या वर्षी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटकाही आला होता. यानंतर त्यांना कोलकात्याच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना जिममध्ये टक्कर आणि थोडं अस्वस्थ वाटू लागल्यानं कोलकात्याच्या रुग्णालयात दाख करण्यात आलं होतं.

कोरोनाचीही झाली होती लागणजानेवारी महिन्यात सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचे बंधू स्नेहाशीष गांगुली यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआयआयपीएल लिलाव
Open in App