Join us  

BCCI Chief Sourav Ganguly : सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स, तीन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आलेला पॉझिटिव्ह

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला २८ डिसेंबरला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 2:47 PM

Open in App

BCCI Chief Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. २८ डिसेंबरला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अद्यापही पूर्णपणे सुधारलेली नाही, परंतु आता त्याच्यावरच घरीच उपचार केले जाणार आहेत. भारताचा माजी कर्णधार गांगुली याच्यात कोरोनाचे हलकी लक्षणं दिसत आहेत. त्यामुळेच त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला गेला. गांगुलीच्या कोरोना सॅम्पलमध्ये ओमायक्रॉनची लक्षण दिसलेली नाहीत. 

तीन दिवसांपूर्वी त्याला कोरोना झाला होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले गेले. या वर्षाय गांगुलीला दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्षाच्या सुरूवातीला त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं काही दिवसांसाठी रुग्णालयात दाखल केले गेले होते. कोरोनामुळे तीन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केल्यानंतर गांगुलीच्या प्रकृतीवर डॉक्टर सातत्यानं लक्ष ठेऊन होते. त्याला आता घरीच विलगिकरणात रहावे लागणार आहे. 

टॅग्स :सौरभ गांगुलीकोरोना वायरस बातम्या
Open in App