कोरोना व्हायरसमुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना घरीच बसावे लागले आहेत. त्यात अनेक क्रीडा संघटनांनी खेळाडूंचे पगार कापण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मडंळही ( बीसीसीआय) असाच निर्णय घेईल, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे भारतीय खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण होते. पगार कपातीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं महत्त्वाचा निर्णय घेतला.
Sachin तुस्सी ग्रेट हो; 5000 लोकांच्या एका महिन्याचा रेशन खर्च उचलला
बीसीसीआयनं गुरुवारी सर्व करारबद्ध खेळाडूंचे तीन महिन्यांचा थकित पगार दिला आणि खेळाडूंना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, हेही स्पष्ट केले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन महत्त्वाच्या क्रिकेट संघटनांनी पगार कपातीचे संकेत दिले आहेत. बीसीसीआयच्या अधिकारीनं सांगितले की,''24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी आम्ही सर्व संभाव्य शक्यतेसाठी तयार आहोत. बीसीसीआयनं करारबद्ध खेळाडूचा तीन महिन्यांचा पगार दिला आहे. त्याशिवाय भारत आणि भारत ए सामन्यांचे फी सुद्धा खेळाडूंना दिली आहे.''
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की,''बीसीसीआय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. अन्य क्रीडा संघटना पगार कपातीवर चर्चा करत आहेत, परंतु बीसीसीआय देशातील सर्व खेळाडूंची योग्य ती काळजी घेण्यास सक्षम आहे. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कोणावरही पगार कपातीचं संकट ओढावणार नाही.''
अऩ्य महत्त्वाच्या बातम्या
Good News : IPL 2020 होणार; BCCI नं तयार केला 'मास्टर प्लान'!
Corona Virus : IPL चॅम्पियन संघाची कोट्यवधींची मदत; अन्य संघ घेणार का आदर्श?
Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरच नव्हे, तर खेळाडूही आले मदतीला
अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीला 'लॉकडाऊन' कळतं, तुम्हाला कधी कळणार? पाहा Cute Video
धवनने लॉकडाऊनचा नियम मोडला; पोलिसांनी पावती फाडली
गरजूंना धान्यवाटप करताना शाहिद आफ्रिदीकडून 'गंभीर' चूक, पाहा व्हिडीओ