Join us  

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक ठरलं, बीसीसीआयनं जाहीर केल्या तारखा

ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:40 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि तीन सामन्यांची वन डे मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्याकालावधीत श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. ही मालिका आटपून ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. येथे ऑस्ट्रेलिया तीन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मालिकेचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले.

भारतीय संघ 10 फेब्रुवारीपर्यंत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याची सुरुवात ट्वेंटी-20 सामन्यांनी होणार आहे. 24 आणि 27 फेब्रुवारीला अनुक्रमे बंगळुरु व विझाग येथे सामने होणार आहेत. त्यानंतर 2 ते 13 मार्च या कालावधीत पाच वन डे सामने खेळले जातील. वन डे सामन्यांच्या आयोजनाचा मान हैदराबाद, नागपूर, रांची, मोहाली आणि दिल्ली यांना मिळाला आहे. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय