जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसला आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्याचे निर्णयही घेण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातील मृतांचा आकडा 90 हजारांच्या घरात गेला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5000 वर गेली असून 166 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमावरही अनिश्चिततेचं सावट आहे. 29 मार्चपासून सुरू होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 15 एप्रिलनंतरही ही स्पर्धा होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यासाठी अनेक पर्यायांचा विचार सुरू केला आहे.
Corona Virus : IPL चॅम्पियन संघाची कोट्यवधींची मदत; अन्य संघ घेणार का आदर्श?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) एक मास्टर प्लान तयार केला असून चाहल्यांना IPLचा आनंद लुटता येणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''परिस्थिती सुधारल्यास आयपीएल जुलै महिन्यात किंवा हिवाळ्यात खेळवण्यात येईल. बीसीसीआय त्यावर विचार करत आहे. गरज पडल्यात रिकाम्या स्टेडियमवर म्हणजेच चाहत्यांशिवाय सामना खेळवण्याची तयारी आहे.'' आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला हजारो कोटींचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआय सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.
Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरच नव्हे, तर खेळाडूही आले मदतीला
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,''लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास संपूर्ण आयपीएल खेळवणे कठीण होईल.'' आयपीएल रद्द झाल्यास स्टार इंडियाकडून मिळणाऱ्या 3269.50 कोटींचा तोटा सहन करावा लागेल. स्टार स्पोर्ट्सनं आयपीएलच्या प्रक्षेपणासाठी 2018मध्ये पाच वर्षांसाठी 16347 कोटींत हक्क मिळवले. शिवाय प्रायोजन व्हिवोकडून मिळणारे 400 कोटीही बीसीसीआयला मिळणार नाही.
IPLसाठी बीसीसीआय 'Asia Cup 2020' स्पर्धा पुढे ढकलणार?आयपीएल 2020 ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खेळवण्याय येईल, अशी चर्चा होती. तसे झाल्यात आशिया चषक 2020 स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ''आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयपीएल खेळवण्याचा विचार सुरू आहे,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं हिंदुस्तान टाईम्सला सांगितले होते.
टीम इंडियाच्या वेळापत्रकानुसार सप्टेंबरमध्ये आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांचे आयोजन होणार आहे. याच काळात दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन महिने क्रिकेट मालिका होणार आहे. पण, या कालावधीत ऑस्ट्रेलियनं संघ फ्री आहे. जर परदेशी खेळाडूंचा सहभाग निश्चित होत असेल, तर बीसीसीआय आयपीएल ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये खेळवू शकते. बीसीसीआय हा मुद्दा आशिया क्रिकेट परिषदेसमोर ठेवणार आहे.