महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मोठा बदल; BCCI चा निर्णय, जाणून किती संघ राहणार, फॉरमॅट कसं असणार  

Womens Premier League : यंदापासून सुरू झालेल्या महिला प्रीमिअर लीगने व्ह्यूअर्सशीपचे अनेक रेकॉर्ड मोडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 06:50 PM2023-04-04T18:50:34+5:302023-04-04T18:51:02+5:30

whatsapp join usJoin us
BCCI contemplates major changes in Womens Premier League format after blockbuster season: WPL season 2 likely to have Home and Away format | महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मोठा बदल; BCCI चा निर्णय, जाणून किती संघ राहणार, फॉरमॅट कसं असणार  

महिला प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मोठा बदल; BCCI चा निर्णय, जाणून किती संघ राहणार, फॉरमॅट कसं असणार  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Womens Premier League : यंदापासून सुरू झालेल्या महिला प्रीमिअर लीगने व्ह्यूअर्सशीपचे अनेक रेकॉर्ड मोडले... पाच संघांचा समावेश असलेल्या WPLच्या पहिल्या हंगाम सर्वांच्या पसंतीत उतरला अन् तेच लक्षात घेऊन पुढील हंगामासाठी BCCIने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी BCCIयने उचललेल्या पावलाचे जगभरातून कौतुक झाले. पहिल्या हंगामात हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले.  


महिला क्रिकेटची लोकप्रियता बघता WPL मध्ये बदल पाहायला मिळणार आहे. PTI ने दिलेल्या माहितीनुसार,  नवीन नियम आणि आयपीएलचे नवीन स्वरूप लक्षात घेऊन BCCI महिला प्रीमियर लीगमध्येही बदल करू शकते. पुढच्या पर्वात महिला क्रिकेटमध्ये होम आणि अवे फॉरमॅट आणू शकते. पुढील तीन पर्वात पाच संघ असतील हेही या वृत्तातून समजतेय.  
 
महिला प्रीमियर लीगपूर्वी महिला ट्वेंटी-२० चॅलेंजचे आयोजन केले जायचे आणि  ही स्पर्धा २०१८ ते २०२२  या कालावधीत खेळवली गेली. यामध्ये फक्त तीन संघ होते आणि सर्व राउंड रॉबिन गटाने अंतिम फेरीत पोहोचले. यंदाची महिला प्रीमियर लीग मुंबईतील केवळ दोन स्टेडियममध्ये पार पडली ज्यामध्ये ५ संघ सहभागी झाले होते. त्यात मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांचा समावेश होता. सर्व सामने ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: BCCI contemplates major changes in Womens Premier League format after blockbuster season: WPL season 2 likely to have Home and Away format

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.